akola zilla parishad Health workers awarded Florence Nightingale Award sakal
अकोला

आरोग्य सेविकांना फ्लोरेंस नाइटिंगेल पुरस्कार बहाल

जि.प. आरोग्य विभागाचे आयोजन; आशा व गट प्रवर्तकांचा केला सन्मान

सकाळ वृत्तसेवा

अकोला : जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील आरोग्य सेविकांना फ्लोरेंस नाइटिंगेल पुरस्कार देवून गुरुवारी (ता.७) गौरव केला.जिल्हा परिषदेच्या कर्मचारी भवन येथे जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून फ्लोरिंग नाइटिंगेल पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन गुरुवारी (ता. ७) करण्यात आले होते.

कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभा भोजने, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती सावित्री राठोड तसेच जिल्हा परिषद सदस्य पुष्पा इंगळे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, डॉ. मनीष शर्मा, हीरासिंग राठोड आदींची उपस्थिती होती. यावेळी सभागृहात मोठ्‍या प्रमाणात आरोग्य सेविका, नर्स, आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक आणि आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.

जि. प. नर्सेस संघटनेकडून पाठपुरावा

आरोग्य विभागात जीवाची बाजी लावू कार्य करणाऱ्या आरोग्य सेविकांच्या हक्काच्या पुरस्कार बाबत शासन स्तरावर जिल्हा परिषदेच्या नर्सेस संघटनेच्या जिल्हाध्यक्ष संगीता जाधव यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने वेळोवेळी पाठपुरावा करून पुरस्कार घेण्याबाबत प्रशासनाला भाग पाडले.

यांना मिळाला पुरस्कार

आरोग्य सेविका मधून प्रथम पुरस्कार बाळापूर तालुक्यातील करुणा इंगळे यांना देण्यात आला. द्वितीय पुरस्कार संगीता जाधव यांना तसेच तृतीय पुरस्कार ज्योती सोळंके यांना देण्यात आला व मेश्राम आरोग्य सेविका यांना सन्मानचिन्ह देण्यात आले. तसेच पातुर तालुक्यातील चोरमारे, आरोग्य पर्यवेक्षिका किरडे, सविता केदार यांना आरोग्य पर्यवेक्षिका पुरस्कार देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missing Link Accident: मिसिंग लिंकवर काळरात्र! आधी पिकअप पलटी, नंतर बस-ट्रकची जोरदार धडक, ६ ते ७ जण जखमी

Inspirational Story: दोन्ही हात नसतानाही हार मानली नाही; माउली बनली महापालिकेची लिपिक, औक्षणाचा क्षण ठरला भावनिक

Pune MPSC Protest: पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांचा दणका; ५१ विद्यार्थ्यांसह २९ खासगी शिकवणी चालकांना नोटिसा

नवरा-मुलीचा मृत्यू, समाजाचे टोमणे अन् डोळ्याला दुखापत; तरीही RAS मध्ये मिळवलं मोठं यश.... रोहिणी गुर्जर यांची जिद्दीची कहाणी

Maharashtra Weather : ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम, मात्र काही जिल्ह्यांत पावसाचा येलो अलर्ट; जाणून घ्या IMD चा अंदाज

SCROLL FOR NEXT