अकोला

पोटनिवडणुकीचा बिगुल वाजला; प्रतीक्षा संपली, 19 जुलैला मतदान

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः जिल्हा परिषदेसह पंचायत समितींच्या ४२ जागा मार्च महिन्यात रिक्त झाल्या आहेत. सदर जागा सर्वसाधारण अर्थात खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याअंतर्गत १९ जुलै रोजी मतदान तर २० जुलै रोजी मतमोजणी होणार आहे, तर इच्छुक उमेदवार १९ जूनपासून ५ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करु शकतील. (Akola Zilla Parishad Panchayat Samiti Election Program)

जिल्हा परिषदेच्या राजकीय आरक्षणाची टक्केवारी ५० टक्क्यांच्या वर जात असल्याने या विषयी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. त्यावर निकाल देत सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गाच्या जागा २७ टक्के नुसारच निश्चित करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे मार्च २०२१ मध्ये अकोला जिल्हा परिषदेतील ओबीसी प्रवर्गासाठीच्या १४ तर अकोला, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, अकोट, तेल्हारा पंचायत समितींच्या २८ जागांवर गडांतर आले होते.

तेल्हारा पंचायत समितीच्या सभापतींसह उपसभापतींना सुद्धा त्यांचे पद गमवावे लागले होते. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार रिक्त जागांसाठी महिला आरक्षण सुद्धा काढण्यात आले होते. परंतु नंतरच्या काळात राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. दरम्यान, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे राजकीय घडामोळींना वेग आला आहे.



२२ जागा महिलांसाठी राखीव
जिल्हा परिषदेचे एकूण ५३ मतदारसंघ (सर्कल) आहेत. त्यात अनुसूचित जातीसाठी १२, अनुसूचित जमातीसाठी ५ व सर्वसाधारण प्रवर्गासाठी २२ जागा आहेत. परंतु आता ओबीसीच्या १४ जागा सुद्धा सर्वासाधारण प्रवर्गासाठी खुल्या झाल्या आहेत. त्यापैकी सात जागा महिलांसाठी राखीव राहणार आहेत. त्यासोबतच सातही पंचायत समित्यांच्या रिक्त झालेल्या २८ जागा सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यात येणार असून त्यापैकी १५ जागा महिलांसाठी राखीव राहतील.



असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम
- निवडणुकीच्या तारखांची सूचना व कार्यक्रम जिल्हाधिकारी यांनी प्रसिद्ध करण्याची तारीख - २९ जून २०२१
- संकेतस्थळावर भरण्यात आलेले नामनिर्देशनपत्र निर्वाचन अधिकाऱ्यांनी स्वीकारण्याचा कालावधी - २९ जून ते ५ जुलै (सकाळी ११ ते दुपारी ३)
- नामनिर्देशन पत्रांची छाननी व त्यावर निर्णय देणे - मंगळवार ६ जुलै (सकाळी ११ वाजतापासून)
- वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक - मंगळवार ६ जुलै (छाननीनंतर लगेच)
- नामनिर्देशन पत्राविरोधात जिल्हा न्यायाधिशांकडे अपिल करणे - शुक्रवार ९ जुलै
- जिल्हा न्यायाधिशांनी अपिलावर सुनावणी व निकाल देण्याची संभाव्य शेवटची तारीख - सोमवार १२ जुलै
- जिल्हा न्यायाधिशांनी अपिल निकालात काढल्यानंतर वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे - सोमवार १२ जुलै
- उमेदवारी मागे घेणे (जेथे अपिल नाही तेथे) - सोमवार १२ जुलै (सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत)
- उमेवारी मागे घेणे (जेथे अपिल आहे तेथे) - बुधवार १४ जुलै (सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत)
- अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे व निशाणी वाटप (अपिल नाही तेथे)- सोमवार १२ जुलै (दुपारी ३.३० नंतर)
- अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे व निशाणी वाटप (जेथे अपिल आहे तेथे) - बुधवार १४ जुलै (दुपारी ३.३० नंतर)
- मतदानाची तारीख - सोमवार १९ जुलै २०२१ (सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत)
- मतमोजणीची तारीख - मंगळवार २० जुलै (सकाळी १० पासून)
- निवडून आलेल्या सदस्यांची नावे प्रसिद्ध करणे - शुक्रवार २३ जुलै पर्यंत



जि.प.च्या या गटांमध्ये निवडणूक
दानापूर, अडगाव बु., तळेगाव बु., अकोलखेडा, कुटासा, लाखपुरी, बपोरी, घुसर, कुरणखेड, कानशिवणी, अंदुरा, देगांव, दगडपारवा, शिर्ला.

पं.स.च्या या गणांमध्ये निवडणूक
हिवरखेड, अडगाव बु., वाडी अदमपूर, भांबेरी, प्रिंप्री खु., अकोलखेड, मुंडगाव, रौंदळा, लाखपूरी, ब्रम्ही खु., माना, कानडी, दहिहंडा, घुसर, पळसो, कुरणखेड, चिखलगाव, निमकर्दा, पारस भाग १, देगाव, वाडेगाव भाग २, दगडपारवा, मोऱ्हळ, महान, पुनोती बु., शिर्ला, खानपूर, आलेगाव.

संपादन - विवेक मेतकर

Akola Zilla Parishad Panchayat Samiti Election Program

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT