Akola zilla parishad teachers transfer sakal
अकोला

Akola : २२१ शिक्षक स्वगृही परतले; २१ जिल्ह्याबाहेर

जिल्हा परिषद शिक्षकांची आंतरजिल्हा बदली

सकाळ वृत्तसेवा

अकोला : गत दोन वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्या यावर्षी करण्यात आल्या. बदल्यांमध्ये जिल्ह्यात २२१ शिक्षक नवीन आले, तर १७ शिक्षक हे जिल्ह्याबाहेर गेले आहेत. संबंधित शिक्षक लवकरच रुजू होणार असल्याने ज्या शाळांमध्ये शिक्षक नाहीत त्या ठिकाणी शिक्षक उपलब्ध होतील.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ग्रामविकास विभागाने शिक्षकांच्या बदल्यांना स्थगिती दिली होती. त्यामुळे दोन वर्षे शिक्षकांच्या बदल्या रखडल्या होत्या. अखेर शिक्षण विभागाकडून या वर्षी आंतरजिल्हा बदलीसाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात आली. कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय शिक्षकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे व बदल्यातील निकष लक्षात घेऊन ऑनलाईन पद्धतीने बदलीची प्रक्रिया पार पडली.

बदली प्रक्रियेत अकोला जिल्हा परिषदेतील १७ शिक्षक हे जिल्ह्याबाहेर गेले, तर २२१ शिक्षकांचे जिल्ह्यात परजिल्ह्यातून जिल्ह्यात आगमण झाले. गत काही वर्षांपासून शिक्षक भरती प्रक्रिया बंद असल्याने शाळांमध्ये हजारो शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिवाय याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत होता. परंतु आता आंतरजिल्हा बदली प्रक्रियेमुळे जिल्ह्याला २२१ नवे शिक्षक मिळाल्याने शिक्षकांच्या रिक्त पदांचा अनुशेष हा काही प्रमाणात भरून निघणार आहे.

२२१ पैकी एक रुजू

आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत २२१ शिक्षक स्वगृही परतले असून यापैकी सर्व कागदपत्रांची पडताळणी करून एकच शिक्षक जिल्ह्यात रुजू झाले आहेत. उर्वरित २२० शिक्षक लवकरच रुजू होणार असल्याची माहिती आहे.

१७ शिक्षकांचा मार्ग मोकळा

परजिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांची चार-पाच वर्षे सेवा झाली की त्यांची नियुक्तीच्या ठिकाणी राहण्याची मानसिकता होते. त्यामुळे जिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीसाठी फार कमी शिक्षक उत्सुक असतात. याच कारणामुळे यंदा केवळ १७ शिक्षक यंदा आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतून स्वगृही गेले. संबंधित शिक्षकांना गुरुवारी (ता. १) कार्यमुक्त करण्याचे आदेश सीईओंनी जारी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : उकाड्यानंतर दिलासा! मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाची हजेरी

Manoj Tiwary : सत्ता जाताच, आपले फिरले! ममता बॅनर्जी सरकारवर भारतीय क्रिकेटपटूचे गंभीर आरोप; प. बंगालमध्ये होता क्रीडा मंत्री

Education Success: ग्रामपंचायत शिपायाची मुलगी पूर्वा कदमची बारावीत ८६ टक्के गुणांसह चमक; सीए होण्याच्या स्वप्नाला आर्थिक बळाची प्रतीक्षा

Latest Marathi News Live Update : मोबाईल चोरी अपयशी ठरल्याने महिलेवर हल्ला

Baramati Crime: फेसबुकवर स्वस्त गहूचे आमिष; व्यापाऱ्याला निर्जन ठिकाणी बोलावून रिव्हॉल्व्हरच्या धाकावर लूट

SCROLL FOR NEXT