Akola zilla parishad teachers transfer
Akola zilla parishad teachers transfer sakal
अकोला

अकोला : बदलीसाठी गुरुजींचा जीव टांगणीला!

सकाळ वृत्तसेवा

अकोला : गत दोन वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्या यंदा होणार आहेत. त्यासाठी शिक्षकांनी प्रोफाईलवर ऑनलाईन माहिती भरण्याची सोमवार शेवटची संधी आहे. शिक्षकांनी प्रोफाईलवर योग्य माहिती भरल्यानंतर शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया अधिक वेगाने राबविण्यात येईल.

शिक्षकांच्या बदल्या यंदा ऑनलाईन होणार असून, जिल्ह्यातील शिक्षकांचा डाटा अपलोड करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या जिल्ह्याअंतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्या या ऑनलाईन पद्धतीने करण्याबाबत ४ एप्रिल प्राथमिक २०२१ च्या शासन निर्णयान्वये सुधारित धोरण निश्चित करण्यात आले आहे. बदल्या ऑनलाईन होणार असून यात तीन भाग केले असून, पहिल्या टप्प्यात बदलीस पात्र असलेल्या शिक्षकांची माहिती अपडेट करणे, आंतरजिल्हा शिक्षक बदली प्रक्रिया माहिती अपडेट करणे, रिक्त पदांची यादी, संभाव्य रिक्त पदांची यादी, जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित केले जाणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात आंतरजिल्हा बदली करणे, तिसऱ्या टप्प्यात जिल्ह्याअंतर्गत बदल्यांचा समावेश आहे. दरम्यान जिल्ह्यातील ३३०० शिक्षकांचा डाटा अपलोड करण्यात आला आहे. त्यात सहाय्यक शिक्षक, पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापकांची पदे आहेत.

असा आहे बदल्यांचा कार्यक्रम

  • शिक्षकांनी माहिती अद्ययावत आणि सबमिट करणे - १३ ते २० जून

  • गटशिक्षणाधिकाऱ्यांनी प्रोफाईल तपासणे - १३ ते २२ जून

  • शिक्षकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे अपील करणे - १४ ते २४ जून

  • शिक्षणाधिकाऱ्यांनी अपील तपासणे - १४ ते २६ जून

  • शिक्षकांनी प्रोफाईल स्वीकारणे - १४ ते २८ जून

  • गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सक्तीची स्वीकृती करणे - २९ जून ते १ जुलै

  • शिक्षकांनी सार्वजनिक आक्षेप घेणे - २४ जून ते ३ जुलै

  • मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आक्षेपांची सुनावणी घेणे - ४ व ५ जुलै

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT