Akola Zilla Parishad Transfers of staff in five divisions sakal
अकोला

अकोला : पाच विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या

जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडली प्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी समुपदेशनाची प्रक्रिया शुक्रवारी सुद्धा जिल्हा परिषदेच्या राजश्री शाहू महाराज सभागृहात पार पडली. सदर प्रक्रियेसाठी सभागृहात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रतीभा भोजने, उपाध्यक्ष सावित्री राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येत असलेल्या पंचायत समित्यांमधील बदल्यांची प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या राजश्री शाहू महाराज सभागृहामध्ये १२ मे पासून सुरू झाली. त्यानुसार गुरूवारी बांधकाम विभाग, लघुसिंचन विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, कृषी विभाग, सामान्य प्रशासन विभाग आणि इतर विभागात कर्मचाऱ्यांना समुपदेशनासाठी सभागृहात बोलावण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी सुद्धा जिल्हा परिषदेच्या सभागृहात बदल्यांसाठी अर्थ, आरोग्य, पशुसंवर्धन, महिला व बाल कल्याण आणि शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करण्यात आले.

यावेळे सध्या नियुक्तीचे ठिकाण व बदलीसाठी उपलब्ध असलेल्या जागेची माहिती कर्मचाऱ्यांना देण्यात आली. त्यामधून रिक्त जागी कर्मचाऱ्यांची बदली निश्चित ठिकाणी करण्यात येईल. समुपदेशाच्या वेळी जिल्हा परिषदेच्या सभागृहात बदली पात्र कर्मचारी उपस्थित होते. बदल्यांमध्ये प्रशासकीय व विनंतीवर बदल्या करण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT