Akola Election: प्रचार तोफा आज थंडावणार! 
अकोला

Akola Election: प्रचार तोफा आज थंडावणार!

जिल्हा परिषदेच्या १४ गटांसह पंचायत समितीच्या २८ गणांसाठी होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीचा जाहीर प्रचार रविवारी (ता. ३) सायंकाळी ५.३० वाजता थांबणार आहे

सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्हा परिषदेच्या १४ गटांसह पंचायत समितीच्या २८ गणांसाठी होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीचा जाहीर प्रचार रविवारी (ता. ३) सायंकाळी ५.३० वाजता थांबणार आहे. त्यामुळे प्रचाराच्या ग्रामीण भाग राजकीय नेत्यांचे दौरे वाढले असून कॉर्नर बैठकांचे सत्र सुद्धा वाढले आहे. काही ठिकाणी तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढत होणार असल्या तरी सर्व राजकीय पक्ष आपलाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात विजयी ठरेल, असा दावा करत आहेत.

आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ओबीसी प्रवर्गातील जागा रिक्त झाल्यामुळे जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या १४ तर पंचायत समितीच्या २८ जागांसाठी मंगळवारी (ता. ५) मतदान तर बुधवारी (ता. ६) मतमोजणी होणार आहे. एकूण ४२ जागांसाठी १८७ उमेदवार पोटनिवडणुकीत रिंगणात आहेत.

वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस, प्रहार व भाजप स्वबळावर तर राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेची आघाडी असल्याने अनेक मतदारसंघात तिरंगी तर चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. पोटनिवडणुकीनंतर जिल्हा परिषदेमधील सत्तेचे समीकरण बदलू शकते. त्यामुळे महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेससह वंचितच्या इतर पक्षांमार्फत प्रचारावर जोरदार भर देण्यात येत आहे. वंचितला जिल्हा परिषदेत स्पष्ट बहुमतासाठी १० सदस्यांची आवश्यकता आहे, तर महाविकास आघाडीच्या सदस्य पक्षांना नऊ जागी विजय हवा आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी लढतीचे चित्र वेगवेगळे असले तरी लढती मात्र अतीतटींच्या पाहायला मिळत आहे.

चुरशीच्या लढतींकडे लागले लक्ष

जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत काही ठिकाणी चुरशीच्या लढती होणार आहेत. कानशिवणी येथे माजी जिल्हा परिषद सदस्या प्रतिभा अवचार व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार किरण अवताडे, अडगाव बु. मध्ये वंचितचे माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाल कोल्हे यांनी बंडखोरी केल्यामुळे त्याठिकाणी चुरशीची लढत होणार आहे. त्यासोबतच इतर ठिकाणी सुद्धा चुरशीच्या लढती होणार आहेत.

३ लाख ७१ हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क

जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमाला गती आली असून ५ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी प्राशसकीय यंत्रणा सज्ज झाली असून जिल्ह्यातील ३ लाख ७१ हजार ७२० मतदार आपला मतदानाचा हक्क या निवडणुकीत बजावणार आहेत.

अशी आहे अंतिम उमेदवारांची संख्या

तालुका जिल्हा परिषद पंचायत समिती

तेल्हारा १६ १८

अकोट १० १७

मूर्तिजापूर ०८ १३

अकोला १५ २१

बाळापूर ०८ १६

बार्शीटाकळी ०६ २१

पातूर ०५ १३

एकूण ६८ ११९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT