Court sakal
अकोला

Crime News : अकोट : शेतीच्या वादातून सख्ख्या भावांची हत्या करणाऱ्या बहिणीला फाशीची शिक्षा

शेतीच्या वादातून पती व मुलांच्या मदतीने सख्खे भाऊ व त्यांची दोन मुले अशा चौघांची हत्या करणाऱ्या बहिणीला अकोट जिल्हा व सत्र न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली.

सकाळ वृत्तसेवा

तेल्हारा - शेतीच्या वादातून पती व मुलांच्या मदतीने सख्खे भाऊ व त्यांची दोन मुले अशा चौघांची हत्या करणाऱ्या बहिणीला अकोट जिल्हा व सत्र न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. दोषी बहिणीसह तिचा पती आणि मुलगा यांना देखील फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असून अकोट जिल्हा व सत्र न्यायालय स्थापन झाल्यापासून फाशीची शिक्षा सुनावण्याची ही पहिलीच वेळ आहे.

वादाचे कारण काय?

मालपूरा गावाजवळ धनराज चऱ्हाटे आणि बाबूराव चऱ्हाटे या भावांचे शेत होते. या शेतात त्यांची बहीण द्वारका तेलगोटेने (वय ५०) वारसाहक्काप्रमाणे हिस्सा मागितला होता.

हिस्सा न मिळाल्यामुळे द्वारकाने दिवाणी न्यायालय तेल्हारा येथे दावा दाखल केला होता. तो दावा न्यायालयात प्रलंबित असताना घटनेच्या एक महिना अगोदर द्वारकाबाईने भाऊ धनराज व बाबूराव यांच्या शेतात मध्यभागी दोन एकर जमिनीवर कपाशीची लागवड केली होती.

परंतू, तिचे भाऊ यांनी सदर क्षेत्रात द्‍वारकाबाईने केलेली कपाशीची लागवड मोडून पुन्हा स्वतः पेरणी केली. त्यामुळे त्यांच्यात सतत वाद होत होते.

भरदुपारी घडलेलं हत्याकांड

२८ जून २०१५ रोजी दुपारी ३ च्या सुमारास द्वारकाबाई ही शेतात कपाशीची पेरणी करत होती. यादरम्यान तिचा भाऊ धनराज व त्यांची दोन मुले शुभम आणि गौरव हे तिथे पोहोचले. द्वारका आणि धनराज यांच्यात शेतातील पेरणीवरून वाद झाला.

गावात परतल्यावर द्वारकाबाईने तिचा मुलगा शाम उर्फ कुंदन यास मालपूरा येथे बोलवले. यानंतर पती हरिभाऊ (वय ५५), शाम (वय २४) आणि द्वारका यांचा अल्पवयीन मुलगा असे सर्वजण मालपुरा येथे शेतात गेले. या चौघांनी मिळून धनराज चऱ्हाटे, बाबूराव चऱ्हाटे यांच्यासह शुभम धनराज चऱ्हाटे आणि गौरव धनराज चऱ्हाटे यांची कोयता, चाकू, कुऱ्हाडीने वार करून हत्या केली.

तपासी अंमलदार यांनी केलेल्या तपासादरम्यान आरोपींनी सख्खे भाऊ आणि त्याच्या दोन मुलांना शेतीच्या हिस्सा या कारणावरून जीवे मारल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणाचा तपास हिवरखेड पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार भाष्कर तवर व हेमंत चौधरी यांनी केला होता. गुन्ह्याच्या सिद्धतेसाठी सरकार पक्षाच्या वतीने न्यायालयासमक्ष एकूण २१ साक्षीदारांच्या साक्ष सरकारी वकील जी.एल. इंगोले यांनी नोंदविल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT