akola sakal
अकोला

बळीराजाची रब्बीच्या पेरणीसाठी लगबग; आर्थिक जुळवाजुळव

तर काही शेतकरी रब्बीच्या पेरणीसाठी आपले शेत तयार करीत आहेत.

संतोष थोरहाते

हिवरा आश्रम : अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतकर्‍यावर संकट आले होते तरी त्या संकटातून धैर्याने सामाना करीत बळीराजा रब्बीच्या तयारीसाठी सज्ज असल्याचे दिसून येत आहे. हिवरा आश्रम परिसरातील बळीराजा रब्बीच्या पेरणीच्या कामाची लगबग असल्याचे दिसून येत आहे. रब्बीच्या पेरणीसाठी शेतकरी आर्थिक जुळवाजुळव करीत आहे.

हिवरा आश्रम परिसरातील शेतकरी आपल्या शेतात गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, करडी, सूर्यफूल, मका या रब्बी पिकांच्या पेरणीच्या कामात शेतकरी व्यस्त आहे. तर काही शेतकरी रब्बीच्या पेरणीसाठी आपले शेत तयार करीत आहेत. शेतात वाढलेल्या तणाची मशागत करून पेरणीची तयारी, शेतात सोंगणी करून पडलेल्या सोयाबीनची मळणी करणे इत्यादी कामे करीत आहे.

अतिवृष्टीचा फटका बसून सोयाबीन, उडीद, मूग इत्यादी पिकांचे नुकसान होऊन उत्पन्नात घट झाली. त्यामुळे शेतकरी मोठया आर्थिक संकटात सापडला आहे. खरीप हंगामाची कामे अंतिम टप्यात आली असून हिवरा आश्रम परिसरातील शेतकर्‍यांनी रब्बी हंगामाची लगबग सुरू असून अनेक शेतकरी आपल्या शेतात रब्बी पिकांची पेरणी करून घेत आहे.

हिवरा आश्रम परिसरात सात हजार ५०० हेक्टर ऐवढे वहतीचे क्षेत्र असून यावर्षी पाच हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकाची पेरणी होणार आहे. हिवरा आश्रम परिसरातील बहुतांशी शेतकर्‍यांच्या सोयाबीन मळणीचे काम झाले आहे. हिवरा आश्रम परिसरातील शेतकर्‍यांनी हरभरा,गहू या रब्बीच्या पिकाला अधिक पसंती दर्शविली आहे. त्यासोबत सिंचनाच्या सुविधेमुळे या परिसरात गव्हाचा पेरा सुध्दा मोठया प्रमाणात होणार आहे.

रब्बी पेरणी क्षेत्रात झाली वाढ

हिवरा आश्रम परिसरात पाच हजार हेक्टरावर रब्बी पिकांची पेरणी होणार आहे. हिवरा आश्रम परिसरातील कोराडी जलप्रकल्प व पेनटाकळी जलप्रकल्प तुंडूब भरल्यामुळे परिसरात सिंचनाची सोय उपलब्ध झाली आहे. यामुळे रब्बीच्या पिकाचा पेरा मोठया प्रमाणात होणार आहे. यावर्षी पाच हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकाची पेरणी होणार आहे.

पेरणीपूर्वी बियाण्यांची बीजप्रकिया करा

पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास पाच ग्रॅम ट्रायकोडर्मा व्हीरीडीची बीजप्रक्रिया करावी किंवा दोन ग्रॅम थायरम अधिक दोन ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. यानंतर प्रति १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम रायझोबिअम जिवाणू संवर्धक गुळाच्या थंड द्रवाणातून चोळावे. बियाणे एक तास सावलीत सुकवून लगेच पेरणी करावी.

- राहुल शेषराव घुबे, कृषि सहायक, हिवरा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेटप्रेमींसाठी ६ डिसेंबर आहे खास...आज एक दोन नव्हे तर तब्बल ११ क्रिकेटपटूंचा वाढदिवस 'Birthday Special-11' एकदा वाचाच...

DK शिवकुमार-जारकीहोळी भेटीमागचे राजकारण गडद; सत्तावाटपावरून काँग्रेसमध्ये जोरदार हालचाली, संक्रातीपर्यंत निर्णय होणार?

Panchang 6 December 2025: आजच्या दिवशी शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

Kolhapur Accident : कोल्हापुरात भीषण अपघातात दोन ठार; मुलाच्या शिक्षणासाठी चौकशी करण्यास गेलेल्या बापाचा मृत्यू जिवाला चटका लावणारा...

Ajit Pawar: शेरवानी, फेटा अन् गॉगल… लूक बदलला, ताल जुळला! लेकाच्या लग्नात अजित पवारांचा ‘झिंगाट’ डान्स व्हायरल, दादांचा लूक तर पाहा

SCROLL FOR NEXT