unnamed.jpg 
अकोला

एका गर्भवती तर एका प्रसुत महिलेसह अकोल्यात पुन्हा २२ रुग्ण आढळले

सकाळ वृत्तसेवा

अकोला  ः अकोल्यात मंगळवारी (ता.2) एकूण 48 अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल 22 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून, उर्वरीत 26 अहवाल निगेटिव्ह आले आहे. विशेष म्हणजे यामध्ये एका गर्भवती महिलेसह एका प्रसूत महिलेचाही समावेश आहे. 
मंगळवारी सकाळी प्राप्त अहवालात 12 महिला व 10 पुरुष पॉझिटिव्ह आढळले आहेत. दोन महिला रुग्ण या जिल्हा स्त्री रुग्णालयातून संदर्भित आहेत. हे रुग्ण  रजपुतपुरा येथील तीन,  सिंधी कॅम्प येथिल दोन, माळीपुरा येथील दोन, अशोकनगर अकोटफैल येथील दोन  तर उर्वरीत तारफैल, सिटी कोतवाली, जठारपेठ,  आंबेडकरनगर,  शिवसेना वसाहत,  जुने तारफैल,  आदर्श कॉलनी, गुलशन कॉलनी,  रुद्रनगर, जुनी उमरी नाका,  खदान,  पुरानी मशिद आणि अलिम चौक खदान येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. 

आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-627
मृत्यू-33
आत्महत्या-1
डिस्चार्ज-442
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-151 

लेडी हार्डिंगचा धोका वाढला
आतापर्यंत जिल्हा स्त्री रुग्णांलयातून 7 ते 8 गर्भवती आणि प्रसूत महिलांना कोविडची बाधा झाली आहे. अशातच पुन्हा मंगळवारी दोन महिलांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. तेव्हा लेडी हार्डिंगचा धोका वाढत असल्याचे दिसून येत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

Junnar News : जुन्नर शहरात श्री तुळजाभवानी माता पलंगाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

FOREIGN JOB OPPORTUNITIES: या राशींच्या लोकांना मिळू शकते परदेशात जाण्याची संधी; करिअर आणि पैशांसाठी ठरू शकतो मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT