akola sakal
अकोला

अँटी करप्शनच्या कारवाईत कॉन्स्टेबलसह होमगार्ड अडकले

सदर टिप्पर विरुद्ध कारवाई करण्याच्या उद्देशासाठी ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती

मुशीर खान कोटकर

देऊळगाव राजा (जि. बुलडाणा) : अवैध रेती टिप्पर चालकाकडे ३५ हजार रुपये स्वीकारताना एका हेडकॉन्स्टेबलसह होमगार्डला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याची घटना आज (ता. २१) सायंकाळी देऊळगाव मही परिसरात घडली. याबाबत अँटी करप्शन ब्युरो यांनी दोघा आरोपींना ताब्यात घेतले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार नारायणखेड येथील एका टिप्परला बेकायदेशीर रेतीसह पकडण्यात आले होते. सदर टिप्पर विरुद्ध कारवाई करण्याच्या उद्देशासाठी ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती दरम्यान नारायण खेड येथील २३ वर्षीय टिप्पर चालकाने बुलडाणा अँटी करप्शन ब्युरो विभागाकडे तक्रार नोंदविली होती.

तक्रारीवरून मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पडताळणी करण्यात आली. यावेळी ५० हजारापैकी ३५ हजार रुपये स्वीकारताना एका पोलिस कॉन्स्टेबलसह होमगार्ड यांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले. बुलडाणा अँटी करप्शन ब्युरोच्या सदर कारवाईत देऊळगाव मही येथील हेडकॉन्स्टेबल संजय देविदास चवरे (वय ४०) व होमगार्ड दत्तात्रय उर्फ सोनू भीमराव शिंगणे (रा. देऊळगाव मही) यांना ताब्यात घेण्यात आले. सदर कारवाईत पोलिस निरीक्षक सचिन इंगळे, पोलिस हवालदार महादेव चव्हाण, विलास साखरे,अझहरुद्दीन काझी आदिंनी सहभाग नोंदविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Canada Trade War: अमेरिकेचा कॅनडाला मोठा आर्थिक धक्का; ५०% टॅरिफ लागू, कार्नींचा प्रत्युत्तराचा इशारा, म्हणाले...

IND vs SL 2nd Test: कुलदीप यादव की सारांश जैन? गौतम गंभीरच्या एका वक्तव्याने वाढलं सस्पेन्स; दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा मोठा निर्णय?

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधताना किती गाठी बांधायच्या असतात? जाणून घ्या यामागची खास मान्यता

Mumbai Accident: मुंबईत हिट-अँड-रनचा थरार! रस्ता ओलांडणाऱ्या विद्यार्थिनीला बाईकने उडवलं; अंगावर काटा आणणारा VIDEO VIRAL

पुण्यात काल नेमकं काय घडलं? COEP तील गोंधळाबाबत विद्यार्थ्यांनी जारी केलं निवेदन, निष्पक्ष चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT