Crime News sakal
अकोला

Crime News : नालीच्या सांडपाण्यावरुन पती - पत्नीवर प्राणघातक हल्ला

उपचारादरम्यान पतीचा मृत्यू ; बाळापूर शहरातील घटना

सकाळ डिजिटल टीम

बाळापूर : नालीच्या पाण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून पाच ते सहा गुंडांनी एका दाम्पत्याच्या घराबाहेर चाकूने सिनेस्टाईल मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बाळापूर शहरात घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या दाम्पत्यापैकी पतीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून या घटनेमुळे बाळापूर शहरात खळबळ उडाली आहे. बाळापूर शहरातील आयटीआय भागात असलेल्या घरकुल परीसरात ही घटना घडली आहे. या भागात फिर्यादी व आरोपी हे शेजारी राहतात.

अनेक वेळा त्यांच्यात नालीच्या सांडपाण्यामुळे वाद निर्माण होत असत. रविवारी सायंकाळी पुन्हा वाद उफाळून आला. या वादात दाम्पत्यावर चाकूने वार करण्यात आले. या हल्ल्यात हुमेरा नाज मो. बुरहान (३३) व तीचा पती मो. बुरहान हे दोघेही जखमी झाले होते. त्यांना तातडीने अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज सोमवारी दुपारी मो. बुरहान यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आलेल्या पाच ते सहा गुंडांनी घराबाहेरच असलेल्या दाम्पत्याला चाकूने मारून जखमी केले. पत्नीला सोडवायला आलेल्या पतीला चाकू हल्ला चढवत गंभीर जखमी करण्यात आले.

आरोप शेख अजहर शेख मजहर (३४) याच्याशी या दाम्पत्याचा वाद सुरू होता. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेत असलेल्या दाम्पत्याला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेतील मुख्य आरोपी शेख अजहर शेख मजहर याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

गल्लीत एकच धावपळ

पती-पत्नीवर अचानक झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे गल्लीत एकच धावपळ उडाली. काय झाले म्हणून मदतीला धावणाऱ्यांनाही गुंडांनी शस्त्राचा धाक दाखवत धमकावले. हल्लेखोर निघून गेल्यावर गल्लीतील तरुणांनी दोघांना जखमी अवस्थेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दखल केले. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी धाव घेतली. जखमींनी दिलेल्या जबाबावरून बाळापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील संशयितांची नावे पोलिसांनी निष्पन्न केली असून, त्याचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress spokesperson assaulted Video : काँग्रेस प्रवक्त्यास पुण्यात मारहाण!, प्रदेशाध्यक्ष सपकाळांनी ट्वीट केला घटनेचा व्हिडिओ

टी-२० विश्वचषक सामन्यावर सट्टेबाजी! स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने केली कठोर कारवाई

T20 WC, WI vs ZIM: ७ चौकार, ७ षटकार... वानखेडेवर हेटमायरचं वादळ; झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना झोडपत विंडीजसाठी रचला वर्ल्ड रेकॉर्ड

Latest Marathi News Live Update : वीज कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Virar News : मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे संदर्भात जपान आंतरराष्ट्रीय संस्था JICA यांची वसई-विरार शहर महानगरपालिकेला भेट

SCROLL FOR NEXT