जन्मठेपेची शिक्षा Sakal
अकोला

'गुड टच बॅड टच’चे धडे देताना धक्कादायक वास्तव; अत्याचारी बापाला जन्मठेप

पोलिसांच्या शिकवणीतून गुन्हा उघडकीस, अखेर अत्याचारी बापाला जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा

अकोला : ‘गुड टच बॅड टच’चे धडे देताना धक्कादायक वास्तव

न्यायालयाचा निकाल; अत्याचारी बापाला जन्मठेप

अकोला : शाळेमध्ये ‘गुड टच बॅड टच’चे धडे पोलिसांनी दिले. त्यानंतर १२ वर्षाच्या पीडितेने मैत्रिणीजवळ बोलण्याची हिम्मत केली. त्यानंतर कळले की जन्मदाताच आपल्या मुलीवर अत्याचार करायचा. या नराधम बापाला विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.डी. पिंपळकर यांच्या न्यायालयाने मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

नात्याला काळीमा फासणारी ही घटना मुर्तिजापूर तालुक्यातील आहे. ता. १० डिसेंबर २०१९ रोजी पीडित मुलगी, तिची मैत्रिण, आई व ग्रामसेविका यांनी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली होती. त्यावेळी पीडित ही १२ वर्षांची होती. दिव्यांग असलेल्या आपल्या मुलीवर तिचा बापच अत्याचार करायचा. या घटनेची वाच्यता मुलीने आईकडे केली होती.

मात्र तिला उलटपक्षी धमकावत दुर्लक्ष केले. एकदा आरोपीच्या भावंडाच्याही निदर्शनास आल्यानंतर त्यांनाही चूप राहण्यास सांगण्यात आले. दोन वर्ष अत्याचार केल्याने अचानक एक दिवस शाळेत पोलिस गेले आणि मुलांना ‘गुड टच व बॅड टच’ विषयी माहिती दिली. त्यानंतर मुलीने तिच्या मैत्रीणीला सांगितल्यानंतर तिने तिच्या आईला सांगितले. त्यानंतर पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणाची सुनावणी दरम्यान सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकिल किरण खोत यांनी आठ साक्षीदार तपासले. त्यात पीडित, आई, तपास अधिकारी एपीआय संजय खंडारे यांच्या साक्षी नोंदवल्या. न्यायालयाने नराधम बापाला दोषी ठरवून आजन्म कारावासाची शिक्षा, कलम ३७६(३) मध्ये १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व विविध कलमा अंतर्गत दोन लक्ष ७५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास प्रत्येक कलमामध्ये अतिरिक्त सहा महिन्याची शिक्षा आरोपीस भोगावी लागेल.

पीडितेची आई झाली फितूर

या प्रकरणात पीडित बालिकेची आई फितूर झाली. मात्र न्यायालयाने पीडितेची साक्ष, इतर साक्षपुरावेचे आधारावर आरोपीस घृणीत कृत्याबद्दल दोषी धरण्यात येऊन शिक्षा ठोठावली. सरकारतर्फे सहायक सरकारी वकिल मंगला पांडे व किरण खोत यांनी बाजू मांडली. विजय विल्हेकर व प्रवीण पाटील यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गांधीजींनी २१ दिवस उपोषणात लिंबू तर सोनम सरांनी २६ दिवस फक्त...; अभिजीत दीपकेचा मोठा खुलासा

Abhijeet Dipke on Jai Bhim : 'जय भीम' हा नारा केवळ एका समाजाचा नाही; अभिजीत दिपके यांचे वक्तव्य, 'ब्लॅक अँड व्हाईट'मध्ये अनेक खुलासे

Abhijit Dipake: योगी, मोदी, BJP आयटी सेलचे लोक शिवीगाळ करतात, त्यांच्यावर FIR का नाही? अभिजीत दिपकेंचा सवाल

Sangli Kolhapur Flood Risk : कर्नाटकची मुजोरी अन् सांगली-कोल्हापूरला पुराचा धोका! आलमट्टी धरणाच्या पाणीसाठ्यावरून 'इरिगेशन फेडरेशन'चा इशारा

Latest Marathi News Live Update : अमित शहासुद्धा हसत असतील, भाजपची बी टीम असल्याच्या आरोपावर अभिजीत दीपकेचं उत्तर

SCROLL FOR NEXT