Attempt of self-immolation of a trader in Akola Municipal Corporation itself file photo
अकोला

अकोला; महानगरपालिकेतच व्यापाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

भाजपच्या कामगार सेलाचा विभागीय प्रभारी, पोलिसांनी घेतले ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः महानगरपालिका प्रशासनाने Akola Muncipal Corporation जनता भाजी बाजारातील व्यापाऱ्यांना नोटीस बजावल्याच्या कारणावरून आशीष ढोमणे या भाजी विक्रेत्यांने मनपा आयुक्तांच्या दालनापुढे जाळून घेण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी सायंकाळी ४ ते ५ वाजताच्या दरम्यान घडली. तो भाजपच्या कामगार सेलाचा विभागीय प्रभारी आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.Attempt of self-immolation of a trader in Akola Municipal Corporation itself

मनपाच्या वतीने जनता भाजी बाजार येथील व्यापाऱ्यांना नोटीस बजावली आहे. येथील व्यापारी संकुल उभारण्यात येत असल्याने येथील व्यापाऱ्यांना त्यांच्या दुकानाच्या जागेबाबत मालकी हक्काचे पुरावे सादर करण्यास सांगण्यात आले होते.

ही नोटीस प्रशासनाने सोमवारी स्थगित केली. त्यानंतरही आशीष ढोमणे या व्यापाऱ्याने मनपा आयुक्तांच्या दालनात दाखल होत त्यांना निवेदन सादर करण्याचा प्रयत्न केला व त्याचवेळी अंगावर रॉकेल टाकून स्वतःला जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथे उपस्थित असलेले सुरक्षा रक्षक व कर्मचाऱ्यांसह पोलिस कर्मचाऱ्यांनी वेळीत धाव घेवून त्याला वाचविले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

संपादन - विवेक मेतकर

Attempt of self-immolation of a trader in Akola Municipal Corporation itself

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT