rain SAKAL
अकोला

अकोले तालुक्यात धुव्वाधार

रंधा धबधबा कोसळू लागला, पाचनईत सात इंच पाऊस

सकाळ वृत्तसेवा

अकोले : भंडारदरा, मुळा पाणलोट क्षेत्रात धुव्वाधार पाऊस सुरू असून, कृष्णावंती नदीवरील वाकी तलाव आज (शनिवारी) दुपारी एक वाजता पूर्ण क्षमतेने भरला. हा प्रकल्प ओव्हर-फ्लो झाल्याने निळवंडे जलाशयाकडे पाणी झेपावले आहे. आज पाचनई येथे सात, तर रतनवाडी येथे साडेपाच इंच पावसाची नोंद झाली.

आज सकाळपासूनच पाणलोट क्षेत्रात धुव्वाधार पाऊस सुरू असल्याने परिसरातील जनजीवन विस्कळित झाले आहे. घाटघर, रतनवाडी, साम्रद, पांजरे, शिंगणवाडी आदी दहा गावांचा संपर्क तुटला आहे. जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांनी शेतीची कामे थांबविली आहेत, तर जनावरांनादेखील घरात कोंडले आहे. भातखाचरे भरली असून, शेतकरी पाऊस थांबण्याची वाट पाहत आहेत.

भंडारदरा जलाशयात सकाळपासून सायंकाळी सहापर्यंत ४०९ दशलक्ष घनफूट, तर आतापर्यंत १८४१ दशलक्ष घनफूट आवक झाली असून, जलाशयात ४३०५ दशलक्ष घनफूट साठा आहे. ११२ दशलक्ष घनफूट क्षमतेचा वाकी जलाशय भरला आहे. कृष्णावंती नदीतून सुमारे ३०० क्यूसेकने विसर्ग सुरू असल्याने रंधा धबधबा कोसळू लागला आहे.

निळवंडे जलाशयात ३२ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली असून, जलाशयात ३६३४ दशलक्ष घनफूट साठा आहे. मुळा पाणलोट क्षेत्रात ढगफुटीसदृश पाऊस कोसळत असून, हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचनई येथे १८० मिलिमीटर, म्हणजे सात इंच पाऊस झाला आहे.

मुळा नदीपात्रातून सहा हजार क्यूसेकने विसर्ग सुरू होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT