Bachchu Kadu says that the administration should not back the contractor by giving two lines of notice akola marathi news 
अकोला

बच्चू कडू म्हणतात, दोन ओळीची नोटीस देऊन प्रशानसनाने कंत्राटदाराला पाठीशी घालू नये

सकाळ वृत्तसेेवा

अकोला ः जिल्हा स्री रुग्णालयाच्या स्वच्छता कंत्राटदाराला तात्पुरती नोटीस देऊन गय केल्याप्रकरणी कार्यालय प्रमुख ललित अंभोरे यांची वेतनवाढ रोखण्याचे आदेश पालकमंत्री बच्चू कडू यांनी मंगळवारी (ता.२) जिल्हा स्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.आरती कुलवाल यांना दिले. पालकमंत्री बच्चू कडू यांनी मंगळवारी दुपारी जिल्हा स्री रुग्णालयात भेट दिली.

दरम्यान त्यांच्या अजेंड्यावर स्वच्छता हा विषय प्रामुख्याने असल्याने त्यांनी विविध वार्डाची पाहणी केली. यापूर्वी दिलेल्या भेटीत त्यांनी अस्‍वच्छतेच्या विषयांवरून संबंधित कंत्राटदाराला एक लाख रुपयांचा दंड दिला होता. मात्र तो दंड संबंधित कंत्राटदाराने अद्यापही भरला नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात आढावा घेताना पालकमंत्र्यांना प्रशासनाकडून संबंधित कंत्राटदाराला तात्पुरती नोटीस देत त्याचा बचाव केल्याचे दिसून आले. 

त्यामुळे त्यांनी कार्यालय प्रमुख ललित अंभोरे यांची वेतनवाढ रोखण्याचे आदेश वैद्यकीय अधीक्षक डॉ.आरती कुलवाल यांना दिले. तसेच जिल्हा स्री रुग्णालयाची अजूनही ५० टक्के स्वच्छता नाही. यात सुधारणा न झाल्यास संबंधित कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करण्याचा इशारा त्यांनी दिला. ‘गरज आणि सुंदरता’ या थीमवर आधारित एक येथे चांगला वार्डही तयार करण्याचा मानस पालकमंत्री बच्चू कडू यांनी बोलून दाखविला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजकुमार चव्हाण, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी सुनिल पाटील यांच्यासह अन्य यावेळी उपस्थित होते.

‘पालकमंत्री येत आहेत स्वच्छतेला लागा’
मंगळवारी (ता.२) दुपारी पालकमंत्री बच्चू कडू येत असल्याचा मॅसेज जिल्हा स्री रुग्णालयाकडे धडकला. त्यानंतर प्रशासन अलर्ट झाले. लगेच कर्मचाऱ्यांना स्वच्छतेला जुंमण्यात आले. नियमीत स्वच्छता होत नाही का असा प्रश्‍न या निमित्तानं उपस्थित होत आहे.पालकमंत्री यांंनी यापूर्वी स्वच्छता कर्मचाऱ्यांना पुरेसे संरक्षण द्या, नंंतरच त्यांना कामाला लावा अशी तंबी प्रशासनाला दिली होती. मात्र हॅन्डग्लोज विनाच कर्मचाऱ्यांकडून लेडी हार्डिंगमध्ये काम करून घेतले जात असल्याचीही  बाब त्यांच्या आगमनापूर्वी दिसून आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Dashavatar: दशावतार चित्रपटात दाखवलेला तो 'राखणदार' कोकणात खरंच असतो का? काय आहे परंपरा?

Crime News : सिन्नरमधील वायर चोरी प्रकरणी दोघांना अटक; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Updates : करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन उद्या दिवसभर बंद राहणार

SCROLL FOR NEXT