Akola News 
अकोला

Akola News: रस्त्यांची दुर्दशा! आमदारांच्या फोटोसमोर खड्ड्यात लावले दिवे

सकाळ वृत्तसेवा

तेल्हारा: गत अनेक वर्षांपासून तालुक्यातील रस्त्यांची असलेल्या दुर्दशामुळे नागरिकांना त्रास होत आहे. निवेदने, आंदोलने करून काहीच फायदा झाला नाही. तालुक्यातील दयनीय रस्त्याबाबत प्राशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने कालेगाव-तेल्हारा रस्त्याकरिता पाथर्डी ते सिरसोली रस्त्यावरील खड्ड्यात आमदारांचे उलटे छायाचित्र ठेवून त्यासमोर दिवे लावून आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले.

तेल्हारा तालुक्यातील चारही बाजूच्या मुख्य रस्त्यासह ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था गेल्या दहा वर्षांपासून अतिशय खराब झाली आहे. खराब रस्त्यांमुळे अनेक लहान-मोठे अपघात घडले असून, यामध्ये अनेक नागरिकांनी आपले प्राण गमावले असून, कित्येकांना कायमचे अपंगत्व आले आहे.

रस्त्यासाठी तालुक्यात अनेक वेळा लहान-मोठे आंदोलन झाले आहेत. तालुक्यातील कालेगाव-तेल्हारा रास्ता त्वरित दुरुस्त व्हावा याकरिता ता. १५ ऑगस्ट रोजी बहुजन वंचित युवा आघाडीच्या वतीने सिरसोली-पाथर्डी रस्त्यावरील खड्ड्यात स्थानिक आमदारांचा उलटे छायाचित्र ठेवून त्यापुढे दिवा लावून आंदोलन केले. यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (akola latest news)

आंदोलनामुळे एक दिवा रस्त्यावरील खड्ड्यांसाठी, तेल्हारा तालुक्याच्या विकासासाठी, असे चित्र रस्त्यांवर दिसून आल्यामुळे तालुक्यातील उदासीनता दूर होईल, अशी अपेक्षा नागरिकांना आहे. रस्त्यांचे स्वरूप बदलावे, सुविधायुक्त रस्ते नागरिकांना मिळावे हाच आजच्या आंदोलनाच्या मागचा उद्देश आहे. आंदोलनानंतर प्रशासनाच्या व आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या डोळ्यात उजेड पडावा, रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात यावे एवढीच आमची अपेक्षा आहे.

- संदीप गवई, महासचिव, वंबयुआ, तेल्हारा.

तालुक्यातील प्रत्येक गावाला जाणारा जो जोड रस्ता आहे तो पूर्णता खराब झाले आहेत. दहा वर्ष दिल्यावरही एक लोकप्रतिनिधीकडून सर्वसमावेशक काम होत नाही आणि त्याला विकास महर्षी संबोधले जाते! यापेक्षा खेदाची बाब नाही. त्यासाठी वंचित बहुजन युवक आघाडीकडून आमदार प्रकाश भारसाकडे यांना खड्ड्यामध्ये दिवे लावून प्रकाश दाखवण्यात आला. आता मावळताना तरी ते आपला प्रकाश दाखवतील, अशी अपेक्षा आहे.

- जिया शहा, अध्यक्ष, वंबयुआ, तेल्हारा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा हादरलं! शांतता रॅलीत भीषण स्फोट; १४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, नेमकं काय घडलं?

प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

SCROLL FOR NEXT