balapur nagad farmer gave cow Dohale Jevan love animal conservation
balapur nagad farmer gave cow Dohale Jevan love animal conservation Sakal
अकोला

Akola News : भोवताली बसा, तिला काय हवं पुसा.. तिचे डोहाळे पुरवा; नागद येथे शेतकऱ्याने दिले गायीचे डोहाळ जेवण

अनिल दंदी

बाळापूर : कोणत्याही स्त्रीचा गर्भधारणा हा क्षण तिच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो. मातृत्व ही महिलांच्या जीवनातील सुंदर अनुभव असतो. कुटुंबातील महिला गरोदर असेल तर संपूर्ण परीवाराला गगन ठेंगणे भासते मात्र बाळापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याने डोळ्यांची पारणे फिटतील, असा गायीच्या डोहाळ जेवणाचा सोहळा साजरा करून गायीच्या संवर्धनाचा आगळा वेगळा संदेश दिला.

तालुक्यातील नागद येथील दिलीप मधुकर ठाकूर या शेतकऱ्याने गायीचे डोहाळ जेवण करीत, गायीच्या मातृत्वाचा उत्सव साजरा केला आहे. असा हा आगळावेगळा सोहळा गुरुवारी (ता. ४ रोजी) रात्री रंगलेला होता.

नागद सारख्या छोट्या गावात वेगळा कार्यक्रम संपन्न झाल्याने परिसरात तो चर्चेचा विषय बनला आहे. ठाकूर कुटुंबियांनी गरोदर स्त्री प्रमाणेच गायीचेच डोहाळे जेवण घातले आहे. सर्वकाही विधीवत करुन आख्ख्या गावाने या कार्यक्रमाची शोभा वाढवली होती. या निमित्त विविध कार्यक्रम हे ठाकूर यांच्या घरी पार पडले. यामुळे ते चर्चेत आले आहेत.

अगदी गरोदर महिलांचा जसा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम असतो तसाच कार्यक्रम या गाईचा ही केला. ठाकूर कुटुंबीयांकडे काही गोवंश आहेत. शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन केले जाते. सध्याच्या आधुनिकीकरणाच्या युगात गायींची संख्या रोडवली असताना त्यांनी गायीच्या संगोपनासाठी पुढाकार घेतला आहे.

त्यांच्या घरी असलेल्या मुन्नी नामक गायीच्या डोहाळे जेवण सोहळा आयोजित करण्याचे ठरवले होते. गाईचे डोहाळे जेवण पुरवण्याच्या कार्यक्रमात अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सकाळी गाईची पूजा केली आणि तिला फुलांनी देखील सजवले गेले होते. महिलांनी त्या गाईची पुजासुद्धा केली होती. त्यासोबत भजन कीर्तन असे, अनेक कार्यक्रम होते.

हल्लीच्या काळात गोवंशाची संख्या रोडावत चालली आहे, गायींची संख्या तर नगण्य आहे. गायींची संख्या वाढली तर जातीवंत बैलांची पैदास हा मुख्य उद्देश सफल होतो. आमच्याकडे गाय पाळली असून कुटुंबातील सदस्याप्रमाणे तिची काळजी घेत आहोत. सध्या ही गाय गाभण असून तिचे डोहाळे जेवण साजरे करून गो माता पालनाचा संदेश आम्ही दिला आहे.

- दिलीप ठाकूर, शेतकरी, नागद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR Live Score: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT