fraud sakal
अकोला

अकोला : मुंडगावकर ज्वेलर्सची बँक खाती गोठवली

आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास; २४३ गुंतवणकुदारांची १० कोटीवर फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

अकोला : सराफा व्यावसायिक मुंगगावकर ज्वेलर्सकडून झालेल्या आर्थिक फसवणूक प्रकरणातील तक्रारींचा ओघ वाढतच आहे. आतापर्यंत अडीचशेच्या जवळपास तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यांची १० कोटीवर फसवणुकीचे प्रकार उघडकीस आले आहे. या प्रकरणाचा तपास अकोला आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला असून, आतापर्यंत मुंगडगावर ज्वेलर्सची सर्व बँक खाती गोठवण्यात आली आहे. याशिवाय स्थावर मालमत्ताही संरक्षित करण्यात आली आहे.

सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये मुंडगावकर ज्वेलर्सच्या विरोधात तक्रार दाखल झाली होती. या गुन्ह्यातील आरोपी अमोल विजय पिंजरकर (मुंडगांवकर), वय ४२ वर्षे, उदय विजय पिंजरकर (मुंडगांवकर), वय ४० वर्षे, विजय ओंकार पिंजरकर (मुंडगांवकर), वय ७० वर्षे, सौ. सविता अमोल पिंजरकर (मुंडगांवकर) वय ३८ वर्षे, सौ. किरण उदय पिंजरकर (मुंडगांवकर) वय ३५ वर्षे, सर्व रा. लक्ष्मीनगर, गौरक्षण रोड, अकोला, मंगलसिंग गंगासिंग ठाकुर वय-४८ वर्षे, मुनिम रा.गीता नगर,अकोला यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल झाला होता. त्यांनी लोकांना त्यांचे न्यू मुंडगांवकर ज्वेलर्स, श्री मुंडगांवकर ज्वेलर्स, मुंडगांवकर ज्वेलर्स या प्रतिष्ठानमध्ये रोख रक्कम व सोन्याची गुंतवणूक केल्यास त्यावर आकर्षक व्याज दर देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून गुंतवणुक स्वीकारली.

त्याबदल्यात त्यांनी गुतवणुकदारांना पावत्या, वचन चिट्ठीवर बनावट सह्या करून सुरुवातीस व्याज दिले. त्यामुळे गुंतवणुकदारांचा आरोपींवर विश्वास कायम झाला. या विश्वासाचा गैरफायदा घेवून आरोपींनी कोट्यावधी रुपयांच्या रोख रक्कम व सोन्याच्या स्वरूपात ठेवी स्वीकारून नंतर आरोपी हे त्यांचे प्रतिष्ठाण बंद करून पळून गेले. गुंतवणुकदार/ठेवीदार त्यांचे ठेवी स्वरूपात ठेवलेली रक्कम/सोने मागण्याकरिता आरोपीतांचे राहते घरी तसेच दुकानात गेले असता घराला/दुकानाला कुलूप होते. गुन्ह्यातील काही आरोपींनी न्यायालयात जामीनासाठी अर्ज केलेले असून, त्या अनुषंगाने न्यायालयात सुनावनी सुरू आहे. उर्वरीत इतर आरोपी हे अद्याप बेपत्ता आहेत. आतापर्यंत एकूण २४३ गुंतवणकुदारांची १० कोटी २७ लाख ७६ हजार ७२४ रुपये एवढी फसवणूक केल्या संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तक्रारींचा ओघ सुरूच आहे.

आरोपींच्या शोधासाठी पथक

गुन्ह्यांतील फरार आरोपींचा शोध घेणे कामी पथक नेमण्यात आले आहे. अद्यापर्यंत ज्या गुंतवणुकदारांनी तक्रारी सादर केल्या नाहीत त्यांनी आर्थिक गुन्हे शाखा, पोलिस अधीक्षक कार्यालय अकोला येथे त्यांच्या तकारी सादर कराण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक जी.श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT