bank employees strike esakal
अकोला

बँक कर्मचारी आजपासून संपावर; खासगीकरणाला विराेध

दोन दिवस राहणार व्यवहार बंद; नवीन कामगार कायदा

सकाळ वृत्तसेवा

अकोला : नवीन कामगार कायदा, खासगीकरणाला विराेध करण्यासह अन्य मागण्यांसाठी ता. २८ व २९ मार्च राेजी कामगारांचा देशव्यापी संप आहे. या संपात बॅंक कर्मचारी, अधिकारी सहभागी होत आहेत. त्यामुळे या दोन दिवशी बँकांचे व्यवहार बंद राहणार आहेत.

‘एआयबीईए’, ‘एआयबीओए’, ‘बेफी’ या तीन संघटनांचे बँक कर्मचारी, अधिकारी दोन दिवसीय संपात सहभागी होत आहेत. या संपात बँक संघटनांतर्फे प्रामुख्याने बँक खासगीकरणाला विरोध ही मागणी पुढे रेटण्यात येत आहे. सरकारतर्फे लोकसभेच्या अधिवेशनात कुठल्याही क्षणी बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयक मांडण्यात येऊ शकते. हे लक्षात घेता बँक कर्मचारी संघटना बँक खाजगीकरण विरोधातील आंदोलन जादा तीव्र करण्याच्या पवित्र्यात आहेत. महाराष्ट्र स्टेट बँक एम्लाईज फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या मते साेमवारी व मंगळवारी हाेणाऱ्या संपात भारतीय मजदूर संघ वगळता इतर सर्व मध्यवर्ती कामगार संघटना, कर्मचारी संघटना, उद्योग निहाय कामगार तसेच कर्मचारी संघटना, बँक, विमा उद्योगातील कर्मचारी तसेच काही अधिकारी संघटना, असंघटीत क्षेत्रातील सर्व कामगार सहभागी होत आहेत.

या बँकांचा संपात सहभाग नाही

कामगार, कर्मचारी व बँक संघटनांच्या दोन दिवसीय देशव्यापी संपात स्टेट बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक या दोन बँकांचे कर्मचारी सहभागी होणार नाहीत. या दोन बँकां वगळता अन्य बँकांचे अधिकारी-कर्मचारी संपात सहभागी हाेतील. ग्रामीण बँक तसेच सहकारी बँकेतील कर्मचारीही या संपात सहभागी हाेण्याची शक्यता आहे. बँक ऑफ महाराष्ट्राचे अधिकारी-कर्मचारी या संपात सहभागी हाेत आहेत.

या प्रमुख मागण्यांसाठी संप

  • नवीन पेन्शन याेजना रद्द करण्याची मागणी.

  • महागाई भत्ता निर्देशांकाशी निगडीत असलेली जुनी पेन्शन याेजना लागू करावी.

  • बाह्यस्त्रोत, कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नियुक्ती बंद करा.

  • सर्वस्तरावून आवश्यक त्या सर्व जागा भरण्यासाठी नाेकर भरती सुरू करा.

  • सर्व कंत्राटी कर्मचारी, बँक मित्रांना सेवेत समावून घेण्यात यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी धावणार चिपळूण-पनवेल मेमू, मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीचीही घोषणा; पाहा वेळापत्रक

Sindhudurg Teacher Recruitment: सिंधुदुर्गात शिक्षक भरतीचा फज्जा? २८२ पदांची जाहिरात, मिळणार फक्त १६९ शिक्षक; पुन्हा २२५ पदे रिक्त

Mumbai Crime: मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, २६ वर्षीय मॉडेलचा सौदा; प्रसिद्ध हॉटेलच्या रूमवर कंडोमचा बॉक्स अन्...

Marathi News Live Updates : सोलापुरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको, पुणे-हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प

७०,००,००,०००! सचिन तेंडुलकरने 'मुंबई-पुणे'जवळ खरेदी केला भूखंड, ३.९ एकरावर उभारणार सेकंड होम; नेमकी ही जागा कुठे?

SCROLL FOR NEXT