Farmer 4.jpg 
अकोला

राज्यशासनाचा ‘हिरवा’ कंदील...आरबीआयचा मात्र दिवा ‘लाल’

अनुप ताले

अकोला : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र आहेत परंतु, त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळाला नाही, अशा शेतकऱ्यांना थकबाकीदार न समजता पीक कर्जवितरण करण्याचे निर्देश राज्यशासनाने बँकांना दिले होते. परंतु, या निर्देशाच्या अंमलबजावणीबाबत ‘आरबीआय’कडून बँकांना सूचना नसल्याने, संबंधित शेतकऱ्यांना अजूनही खरीप पीक कर्जापासून वंचित राहावे लागत आहे.

शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी महाविकास आधाडीचे सरकार सत्तेवर येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची घोषणा करून मोठा दिलासा दिला. त्यानंतर अल्पावधीतच महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर करून दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. योजनेंतर्गत जिल्ह्यातील एक लाख नऊ हजार शेतकरी पात्र ठरले व त्यांच्या याद्या जाहीर करून त्यांच्या खात्यावर प्रत्यक्ष लाभ देण्याचे कार्य सुरू झाले. परंतु, त्यांचेपैकी 40 हजाराहून अधिक पात्र शेतकऱ्यांना अजूनपर्यंत कर्मुक्तीचा प्रत्यक्ष लाभ मिळालेला नाही. त्यामुळे त्यांची कर्ज खाती निल झाली नसून, थकबाकीदार म्हणून बँकांनी त्यांना नव्याने पीक कर्ज देण्यासाठी सुद्धा नकार दिला. मात्र, या शेतकऱ्यांना थकबाकीदार गृहीत न धरता, त्यांची कर्जमुक्तीची रक्कम राज्यशासनाकडून येणे बाकी असल्याची नोंद करून, त्यांना नव्याने पीक कर्ज वितरीत करण्याचे निर्देश राज्य शासनाने बँकांना काही दिवसांपूर्वी दिले. परंतु, याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून अजूनपर्यंत कोणतीच सूचना बँकांना मिळालेली नाही. त्यामुळे राज्य शासनाच्या निर्देशानंतरही जिल्ह्यातील लाखो शेतकरी पीक कर्ज मिळण्यापासून वंचित आहेत.

आरबीआयकडून सूचना मिळणे बाकी
कर्जमुक्ती योजनेत पात्र असून, योजनेचा प्रत्यक्ष लाभ न मिळाल्याने ज्या शेतकऱ्यांची खाती निल झालेली नाहीत, अशा शेतकऱ्यांना थकबाकीदार गृहीत न धरता कर्ज वितरणाचे निर्देश राज्य शासनाने दिले होते. परंतु, याबाबत अजूनपर्यंत आरबीआयकडून सूचना नसल्याने, बँकांकडून संबंधित शेतकऱ्यांना कर्ज वितरण होणे बाकी आहे. मात्र जिल्हा बँका 1 जूनपासून अशा शेतकऱ्यांना कर्ज वितरण करणार होत्या.
- आलोक तारेनिया, व्यवस्थापक, लीड बँक, अकोला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Maharashtra : राज्यात २० जिल्ह्यांना ऑरेंज, येलो अलर्ट; कमी दाबाच्या क्षेत्राचा विदर्भावर परिणाम, पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार

Maratha Reservation: मनोज जरांगे यांची मोठी घोषणा; १५ सप्टेंबरला मुंबईकडे कूच, १९ पासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण

Pilbhit Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पात विकेंड सफारी महागली; शनिवार-रविवारचे तिकीट २०० रुपयांवर, काय आहे कारण ?

Team India Live Streaming: सुपर संडे! भारताचे दोन मोठे सामने, Asia Cup Final अन् अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार टी२०; कुठे पाहाणार?

Ukadiche Modak Recipe: केशराचा सुगंध, नारळ-गुळाची गोडी आणि 'हा' एक पदार्थ… बाप्पासाठी असे बनवा स्पेशल उकडीचे मोदक!

SCROLL FOR NEXT