बॅंक 
अकोला

बॅंकांच्या वेळा बदलल्या, आता सकाळी 9 पासून राहणार सुरू

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बॅंका, खासगी बॅंकांमध्ये उसळणारी नागरिकांची गर्दी पाहता जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बॅंकांच्या वेळेत वाढ केली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बॅंका, खासगी बॅंका सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरू राहतील. Banks times have changed, now starting from 9am

जिल्ह्यातील बॅंकांमध्ये पीएम किसान योजना, सामाजिक अर्थसहाय्य योजना इत्यादींचे अनुदान काढण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे कोविड विषाणूचा प्रादुर्भाव व फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या कारणास्तव बॅंकेत होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सर्व बॅंकांच्या वेळेत बदल केला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील सर्व बॅंका सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरु राहतील. त्यामुळे बॅंकांमध्ये उसळणारी खातेधारकांची गर्दी कमी होण्यास मदत होईल.

प्रतिबंधित क्षेत्रातील गावांमध्ये सुद्धा सुट

कृषी सेवा केंद्र व कृषी निविष्ठांची दुकाने कृषी प्रक्रिया उद्योगगृहे, शेती औजारे आणि शेतातील उत्पादनांशी संबंधित दुकाने व प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेल्या अकोला तालुक्यातील सांगवी, डोंगरगाव, उगवा, बोरगाव मंजुर, बोरगाव खुर्द, सांगळूद. अकोट तालुक्यातील लोहारी, रुईखेड, बोर्डी, चोहट्टा, अकोली जहॉगिर. बाळापूर तालुक्यातील व्याळा, वाडेगाव, पारस. बार्शीटाकळी तालुक्यातील महान. मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो, मदापुरी. पातुर तालुक्यातील असोला, अंबाशी, सस्ती, विवरा. तेल्हारा तालुक्यातील बेलखेड, सौंदळा, हिवरखेड इत्त्यादी गावातील कृषी सेवा केंद्र व कृषी निविष्ठांची दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ व तेथील बॅंका सकाळी ९ ते दुपारी १ या कालावधीत सुरू राहतील, असे जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

संपादन - विवेक मेतकर

Banks times have changed, now starting from 9am

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT