Be careful! Created by weaving a web of hackers; They are watching akola marathi news 
अकोला

सावधान! हॕकर्सचे जाळे विणून तयार ; सावज हेरतायेत 

सकाळ वृत्तसेेवा

मूर्तिजापूर (जि.अकोला) : फेसबुक आणि मेसेंजर हॕक करणाऱ्यांनी आपले जाळे विणून ठेवले असून सावज हेरताच ते टाकण्याला सुरुवात केली आहे. या तालुक्यात घडलेल्या एका प्रकाराने सर्वाना सावध केले आहे.   

 या तालुक्यातील एका जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकाला या प्रकारातून आर्थिक फटका बासण्यापूर्वीच ते सावध झाल्याने मोठा अनर्थ टळला. घडले असे, की इर्शाद हुसैन खान हे जिल्हा परिषदेच्या या तालुक्यातील एका प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. त्यांना मॕसेंजर ॲप वरून त्यांचे किनखेडचे शिक्षक मित्र अशोक उमाळे यांचा मेसेज आला. त्यात त्यांनी  पाच हजार रूपयांची मागणी केली. कारण सांगितले मुलीच्या प्रकृती अस्वास्थ्याचे. लगेच संदेश देवाण घेवाणीत व्यस्त रहात,  इर्शाद खान यांनी अशोक उमाळे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. ते या प्रकारापासून अनभिज्ञ होते. इर्शाद खान यांचा संशय खरा ठरला. आपल्या मित्राचे मॕसेंजर ॲप हॕक झाल्याचे त्यांनी हेरले. जुजबी चर्चेनंतर शंकास्पद वाटताच हॕकरने चॕटींग बंद केले. यावरून हे सिद्ध होते की हॕकर्स कडे अनेकांची माहिती आहे. उमाळे यांना खान यांनी लगेच झाला प्रकार कथन करून सावध केले. असाच संदेश उमाळेंच्या नावे यवतमाळचे राम आत्राम या शिक्षकालाही आला आहे. दोघेही सायबल सेल कडे तक्रार नोंदविणार आहेत.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

फेसबुक, मॕसेंजर ॲप हॕक करणाऱ्यांनी आपले जाळे विणून ठेवले आहे. सावज टप्प्यात येताच ते जाळे टाकण्याचा प्रयत्न करतात. प्रयत्न फसला, तर पळ काढतात. त्यामुळे प्रत्यक्ष संपर्कानंतरच आर्थिक देवाण घेवाण करणे हितकारक असल्याचे सर्वांनी लक्षात ठेवावे. सतर्क राहावे. हॕकर्सच्या कारस्थानाला बळी पडू नये. अकाऊंट हॅक झाले, तर ज्याची त्यालाच तक्रार करावी लागेल, हे सुद्धा लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

अलिकडे हे प्रकार वाढले आहेत. अॉनलाईन आर्थिक व्यवहार करतांनि खूप काळजी घ्यावी. अनोळखी व्यक्तीसोबत असे व्यवहार करूच नये. चुकून असा प्रसंग आल्यास ताबडतोब अकोला येथील सायबर सेल किंवा आपण ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहोत,शतिथे विनाविलंबा तक्रार नोंदवावी.
-संतोष हम्बर्डे. गोपनीय विभाग, शहर पोलीस ठाणे, मूर्तिजापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''माझा भाऊ...'' मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

National Unity Day : गुजरातमध्ये पार पडणार राष्ट्रीय एकता दिन ; संजीवनीचे बॅण्ड पथक देणार पंतप्रधान मोदींना सलामी

Noida Owl Terror: कुत्रे-माकडांनंतर आता घुबडांची दहशत; थेट डोक्यावर झडप, शहरातील नागरिकांमध्ये पसरली आहे भीती

Ganesh Aarti: यंदा गणपतीच्या आरतीसाठी पुस्तक शोधण्याची गरज नाही; सगळ्या आरत्या मिळवा एकाच ठिकाणी, एका क्लिकवर!

Marathi News Live Updates: ...तर आम्ही रस्त्यावर उतरु- बबनराव तायवाडे

SCROLL FOR NEXT