corona update akola sakal media
अकोला

अकोला : सावधान! कोरोनाचा धोका पुन्हा वाढतोय

खबरदारी आवश्यक; २८ नवे रुग्ण आढळले

सकाळ वृत्तसेवा

अकोला : देशभरात ओमायक्रॉन व्हेरियंटचे(omicron vairent) संकट गडद होत असतानाच जिल्ह्यात(akola covid update) सुद्धा गत दोन दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पुन्हा जिल्ह्याची चिंताजणक स्थितीकडे वाटचाल सुरु झाली असून मंगळवारी (ता. ४) जिल्ह्यात कोरोनाचे २८ नवे रुग्ण आढळल्याने त्यावर अधोरेखित सुद्धा झाले आहे. सदर रुग्णवाढीमुळे जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आता ५२ झाली आहे.जिल्ह्यात मार्च २०२० पासून कोरोना विषाणूने(corona) धुमाकूळ घालायला सुरुवात केली. सुरूवातीला महानगरात आढळलेले कोरोना विषाणूग्रस्त नंतरच्या काळात ग्रामीण भागात सुद्धा आढळले. त्यामुळे जुलै २०२० मध्ये जिल्ह्यात कोरोना विषाणूने थैमानं घातलं. सप्टेंबर २०२० महिन्यात तर कोरोनाचा आलेख उच्चांकीवर होता. नंतरच्या काळात मात्र कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली. त्यामुळे रेड झोन मध्ये असलेला जिल्हा ग्रीन झोनमध्ये गेला होता.( Be careful! The threat of corona is increasing again)

रुग्णसंख्या घटल्याने कोरोनाची पहिली लाट ओसरल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले होते. त्यानंतर फेब्रुवारी २०२१ पासून पुन्हा कोरोना विषाणूग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत गेली. त्यामुळे आरोग्य विभागासह प्रशासनाची डोकेदुखी वाढली. एप्रिल, मे २०२१ या महिन्यात तर जिल्ह्यात कोरोनाचे थैमान घातल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रशासनाने कडक पाऊल उचलत नागरिकांवर निर्बंध लावले. त्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबर २०२१ पासून कोरोना संसर्गाचा ग्राफ खाली येत गेला. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. दरम्यान आता देश, विदेशात ओमायक्रॉनचा धोका वाढला आहे. त्यामुळे कोरोनीची तिसरी लाट येण्याची शक्यता असून जिल्ह्यात सुद्धा गत दोन दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहणे आवश्यक झाले आहे.

तुरीची खरेदी करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी

हंगाम २०२१-२२ मध्ये दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशन लि. मुंबई जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय, अकोला अंतर्गत आधारभूत किंमत धान्य खरेदी योजनेंतर्गत भारतीय खाद्य निगम मार्फत तुरीची खरेदी करण्यात येणार आहे. ऑनलाईन नोंदणी सुरू झाली असून, अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, बाळापूर, बार्शीटाकळी, पारस, पातुर, विवरा, थार या केंद्रावर ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. शासनाने ता. ३ जानेवारी २०२२ च्या आदेशानुसार राज्यात नाफेडतर्फे हमी भावाने तूर पिकाची खरेदी करण्यासाठी नोंदणी सुरू केली आहे. ता. २० डिसेंबर २०२१ पासून खरेदी नोंदणी प्रक्रिया सुरू केलेली आहे. ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता ऑनलाईन ७/१२ उतारा (उताऱ्यात तुर पीक पेऱ्याची नोंद आवश्यक.), आधारकार्ड झेरॉक्स प्रत, आधारलिंक असलेल्या पासबुकची झेरॉक्स प्रत ही कागद पत्रे आवश्यक आहेत.

नागरिकांनी काय करावे?

  1.  अद्याप लसीचा पहिला डोस घेतला नसल्यास पहिला डोस घ्यावा.

  2.  पहिला डोस घेतल्यानंतर वेळ न चुकवता दुसरा डोस घ्यावा.

  3.  नियमित मास्कचा वापर करावा.

  4.  गर्दीच्या ठिकाणी जाने व हस्तांदोलन करणे टाळावे.

  5.  सुरक्षित अंतर ठेवावे.

  6.  हात नियमित साबणाने धुवावे किंवा सॅनिटायझरचा वापर करावा.

अशी आहे जिल्ह्याची स्थिती

कोरोना संसर्ग तपासणीचे मंगळवारी (ता. ४) जिल्ह्यात आरटीपीसीआर तपासणीचे ४०२ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ३८६ अहवाल निगेटिव्ह आले तर १६ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यासोबतच १२ अहवाल खासगी लॅबमध्ये पॉझिटिव्ह आले. त्यामुळे मंगळवारी जिल्ह्यात कोरोनाच्या २८ नव्या रुग्णांची नोंद झाली. मंगळवारी एकाही रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला नाही. त्यामुळे आता जिल्ह्यात कोरोनाच्या ५२ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे ५७ हजार ९५६ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ५६ हजार ७६२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून १ हजार १४२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.__

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

योग गुरूचा १७ वर्षीय मुलीसह ८ महिलांवर अत्याचार, अल्पवयीन पीडितेनं दिलेल्या तक्रारीनंतर सगळा प्रकार उघडकीस

Maharashtra Health Alert: राज्यात असंसर्गजन्य आजारांचा धोका; मधुमेह, दमा, स्थूलतेच्या प्रमाणात वाढ

Big Revelation in Tharla Tar Mag: ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्विस्ट! सायलीच खरी तन्वी! अर्जुनला सत्यासाठी पोहचला थेट बायकोच्या शाळेत

Girish Mahajan : ठाकरे ब्रॅन्ड नामशेष झाला, आगामी निवडणुकीत बॅन्ड वाजणार; गिरीश महाजन यांची घणाघाती टीका

Pimpri News : नागरी सुविधा केंद्राला मुदतवाढ, नव्या निविदा प्रक्रियेपर्यंत अप्पर तहसीलमध्ये सेवांचा पुरवठा सुरूच

SCROLL FOR NEXT