भेंडवड घट मांडणी: पृथ्वीवर अनेक संकटे, या वर्षी कमी पर्जन्यमानाचे संकेत
भेंडवड घट मांडणी: पृथ्वीवर अनेक संकटे, या वर्षी कमी पर्जन्यमानाचे संकेत  
अकोला

भेंडवळची घटमांडणी: पाऊस कमी तर पृथ्वीवर संकटे

सकाळ वृत्तसेवा

अकोला: जवळपास तीनशे वर्षाची परंपरा लाभलेली सुप्रसिद्ध भेंडवळ (Bhendwal) घटमांडणीची भविष्यवाणी आज दिनांक १५ मे रोजी पहाटे सहा वाजताच्या सुमारास चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि त्यांचे सहकारी सारंगधर महाराज यांनी जाहीर केली. (Bhendwal Ghatmandni; Decreases in rainfall and disasters on earth)

त्यानुसार यावर्षी भेंडवड घटमांडणी चे भाकितानुसार पर्जन्यमान कमी सांगितले असून जून महिन्यात कमी पाऊस येईल. सार्वत्रिक पाऊस होणार नाही. जुलै महिन्यात सार्वत्रिक आणि चांगला पाऊस पडेल.

या महिन्यात अतिवृष्टी होण्याचे संकेत आहेत. तर ऑगस्ट महिन्यामध्ये जून-जुलै पेक्षा कमी पाऊस पडेल. आणि सप्टेंबर महिन्यात सर्वात कमी पाऊस सांगितला आहे. यामुळे अनेक ठिकाणी दुष्काळग्रस्त परिस्थिती ची शक्यता वर्तविली आहे. आणि पीक परिस्थिती साधारण राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. यंदा अवकाळी पावसाचे प्रमाणही कमी राहील. तर प्रचंड चाराटंचाई निर्माण होईल. त्यामुळे पशुधन संकटात येईल.

पृथ्वीवर अनेक संकटे येतील. त्यामध्ये नैसर्गिक संकटे, रोगराई, परकीय घुसखोरी, अतिवृष्टी सारख्या आपत्तीला देशाला तोंड द्यावे लागेल.

देशाचा राजा कायम राहील मात्र त्याला प्रचंड संकटांचा सामना करावा लागेल. आर्थिक परिस्थिती अतिशय ढासळलेली राहील. तर राजकीय परिस्थितीही अस्थिर असेल. नैसर्गिक संकटांमध्ये जीवित हानी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता सांगितली आहे.

अशाप्रकारे भेंडवड घटमांडणी चे भाकीत जाहीर करण्यात आले.

संपादन - विवेक मेतकर

(Bhendwal Ghatmandni; Decreases in rainfall and disasters on earth)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Update: पुण्यात 1500 अनाधिकृत होर्डिंग्जवर कारवाईचे आदेश

हवेत उडायचा अन् हवेतच डल्ला मारायचा...110 दिवसात 200 विमानात चोरले मौल्यवान दागिने,  अशी झाली अटक

Virat Kohli & Anushka Sharma: विरुष्काच्या कृतीने भारावले पापाराझी ; जोडीकडून मिळालेल्या सरप्राईज गिफ्टचं होतंय कौतुक...

व्हॅक्सिंगनंतर त्वचा कोरडी पडलीय? करू नका दुर्लक्ष, अशी घ्या काळजी

PM Modi in Nashik : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी प्रशासन ‘अलर्ट’! एक हजाराहुन अधिक पोलिसांचा बंदोबस्त

SCROLL FOR NEXT