Adv. Prakash Ambedkar esakal
अकोला

Prakash Ambedkar : राज्यात कायदा न मानणारं सरकार, भीतीचं वातावरण तयार केलं जातंय; प्रकाश आंबेडकरांचा निशाणा

सरळ सेवा भरतीसाठी विद्यार्थ्यांची प्रचंड आर्थिक लूट

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्र सरकार खासगी कंपन्यांमार्फत सुशिक्षित बेरोजगारांकडून सरळ सेवा भरतीसाठी विद्यार्थ्यांची प्रचंड आर्थिक लुट करीत आहे.

अकोला : जिल्हा परिषद सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीच्या माध्यमातून बेरोजगारांकडून‌ प्रत्येकी ९०० ते‌ हजार रुपये शुल्क वसूल केले जात आहे. ही बेरोजगारांची लूट असून, लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून निधी उभारण्यासाठी ही लूट सुरू असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.

ॲड. आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले, की महाराष्ट्र सरकार खासगी कंपन्यांमार्फत सुशिक्षित बेरोजगारांकडून सरळ सेवा भरतीसाठी विद्यार्थ्यांची प्रचंड आर्थिक लुट करीत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ‘जिल्हा परिषद सरळ सेवा भरती २०२३’ (Akola Zilla Parishad) या नावाने जाहिरात देऊन उमेदवारांकडून महाराष्ट्र सरकार ९०० ते हजार रुपये खासगी कंपनीमार्फत शुल्क वसूल करीत आहे.

राज्य सरकार सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून सुरक्षित बेरोजगारांकडून कोट्यवधीचा निधी वसूल करीत आहे. युपीएससी, एमपीएससीप्रमाणे नाममात्र शुल्क न आकारल्यास आघाडीतर्फे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न

राज्यात कायदा न मानणारे सरकार आहे. लवकरच लोकसभा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात भितीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे जळगावातील पत्रकाराच्या मारहाण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना ॲड. आंबेडकर म्हणाले. हे भितीचे वातावरण कायम ठेवायचे की नाकारायचे, हे मतदारांनी २०२४ च्या निवडणुकीत ठरविले पाहिजे, असे आंबेडकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Savarkar Statue Sangli : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला परवानगीचा अडथळा; राज्य, केंद्र शासनात हिंदुत्ववादी राज्यकर्ते, तरीही दोन वर्षांपासून फाईल रखडली

Pune Crime: उरुळी कांचनमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता; सहा दिवसांनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल

12 मुलं असूनही साऊथ सुपरस्टारला करायचं होतं दुसरं लग्न ! धाकट्या भावाने अभिनेत्रीला करायला लावला ब्रेकअप

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT