Akola bjp News 
अकोला

BJP News: लोक संतापले! थेट भाजपला मतदान न करण्याची घेतली शपथ, कारण...

Sandip Kapde

Akola News : ईपीएस ९५ पेंशनधारकांनी क्रांती दिनी ९ ऑगस्ट रोजी स्थानिक गांधी जवाहर बाग येथे आत्मक्लेष आंदोलन केले. यावेळी पेंशनरांनी आगामी निवडणुकीत भाजपला मतदान न करण्याची शपथ घेतली.

ईपीएस ९५ पेन्शनरांनी ९ ऑगस्ट क्रांती दिनी गांधी जवाहर बाग येथे सकाळी १० ते दुपारी २ यावेळात आत्मक्लेश आंदोलन केले. आंदोलनात बहुसंख्य पेन्शनर उपस्थित होते. आंदोलनाला मार्गदर्शन करताना शंककराव पाटील, अंबादासजी भरणे, संजीव मालोकार, व्ही.ए. देशमुख, एम.टी. इंगळे, रमेश गायकवाड, गोपाल मांडेकर यांनी भाजप सरकारने नऊ वर्षाच्या कार्यकाळात संघटनेच्या एकाही आंदोनलाची दखल न घेतल्याने या सरकारला धडा शिकविल्याशिवाय पर्याय नाही, असे सांगितले. (akola latest news)

त्यानंतर अध्यक्ष देवराव पाटील यांनी भाजप सरकारवर सडकून टिका केली. ते म्हणाले की, केंद्र सरकारने उद्योगपतींचे १४ लाख कोटींचे कर्ज माफ केले. आमदार, खासदार यांना एक वेळ निवडून आल्यावर आयुष्याभर भरपूर पेन्शन वाढवून दिली, परंतु पेंशनरांना तीन हजार रुपये पेंशन वाढ देण्यास सरकारने नकार दिला. त्यामुळे सरकारवर कामगार व कर्मचाऱ्यांचा रोष असून महात्मा गांधी यांच्या पुतळया समोर भाजपला मतदान करणार नाही, अशी सार्वजनिक शपथ यावेळी घेण्यात आली.

पेंशनधारकांनी क्रांती दिनी ९ ऑगस्ट रोजी स्थानिक गांधी जवाहर बाग येथे आत्मक्लेष आंदोलन केले

यावेळी नारायणराव अंधारे, पी.के. देशमुख, केशव कोठाळे, फुरंगे, घोगरे, ताले, चोरे, व इतरांची उपस्थिती होती. यावेळी बुलढाणा जिल्हा संघटनेच्या वतीने एम.टी. इंगळे यांनी देवराव पाटील यांना शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन जीवनगौरव पुरस्कार दिला. (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Local Train: दिवसभरात १,४१४ लोकल फेऱ्या अन्...; गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा दिलासादायक निर्णय

अजितदादांच्या निधनानंतर त्याच दिवशी मंत्रालयातून ७५ शाळांना अल्पसंख्यांक दर्जा; एकाच संस्थेच्या २८ शाळा

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

SCROLL FOR NEXT