अकोला

डोहात बुडालेल्या युवकाचा तिसऱ्या दिवशी आढळला मृतदेह

निखिल देशमुख

नांदुरा (जि. बुलडाणा) : अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापनाच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने मंगळवारी (ता. २१) सकाळी ६:३० वाजता अंडर वॉटर स्वीमिंग सर्च ऑपरेशन राबवून २५ फूट खोल पाण्यातील अक्षय वानखडेचा मृतदेह शोधून बाहेर काढला.

नांदुरा तालुक्यातील निंबोळा देवी संस्थान लगतच्या विश्वगंगा नदीपात्रात औरंगपूर गावालगतच्या डोहात १९ सप्टेंबर रोजी दुपारी पाच वाजताच्या सुमारास बुलडाणा जिल्ह्यातील सिरसोडी येथील अक्षय संदीप वानखडे (वय २०) हा मित्रांसह डोहात गणपती विसर्जन आटोपून आंघोळीसाठी उतरला. इतर मित्र बाहेर आले पण अक्षय बराच वेळ होऊनही बाहेर आला नाही. मित्रांनी अक्षयच्‍या घरच्‍यांना याची माहिती दिली.

घटनेची माहिती गावकऱ्यांनी तहसीलदार राहुल तायडे यांना देताच त्‍यांनी तात्काळ दीपक सदाफळे यांना माहिती दिली. तात्काळ सर्च ऑपरेशन राबविण्यासाठी पाचारण करण्यात आले. जीवरक्षक दीपक सदाफळे आणि त्यांचे सहकारी मयूर सळेदार, उमेश बिल्लेवार, अंकुश सदाफळे, सतीश मुंडाले, ऋषीकेश राखोंडे, राहुल जवके, अंकुश चांभारे, संकेत देशमुख शोध व बचाव साहित्यासह सोमवारी सायंकाळी सहा वाजता घटनास्थळी पोहोचले.

तेव्हा बुलडाणा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार यांच्यासह टीम, बुलडाणा पोलिस पथक व रेस्क्युबोट हजर होती. यावेळी दोन्ही टीम मिळून एक तास सर्च ऑपरेशन राबविले. परंतु, अक्षयचा पता लागला नाही. अंधार झाल्याने रात्री सर्च ऑपरेशन थांबविले. मंगळवारी सकाळीच जीवरक्षक दीपक सदाफळे आणि सहकाऱ्यांनी अंडर वॉटर स्वीमिंग सर्च ऑपरेशन राबवून ३० मिनिटांत तळाशी असलेला अक्षयचा मृतदेह बाहेर काढला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT