Break to corona vaccination in Akola, consequences due to consecutive holidays 
अकोला

कोरोना लसीकरणाला ‘ब्रेक’, सलग सुट्ट्यांमुळे परिणाम 

सकाळ वृत्तसेेवा

अकोला : कोरोना विषाणूची संसर्ग साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यातील ८६ केंद्रावर करण्यात येत असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सलग दोन दिवसांच्या शासकीय सुट्‍यांमुळे ब्रेक लागला आहे. परंतु मंगळवार (ता. ३०) पासून लसीकरण पुन्हा जोमाने सुरू करण्यात येईल, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. असे असले तरी ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासंदर्भात अद्याप जिल्हा आरोग्य विभागाला शासनस्तरावरुन मार्गदर्शनच न मिळाल्याने १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या टप्प्याच्या लसीकरणासंदर्भात आरोग्य यंत्रणा गोंधळलेली आहे.

१६ जानेवारी २०२१ रोजी देशात कोविड-१९ लसीकरण मोहिमेचे उद्‍घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यात तीन ठिकाणी लसीकरण मोहिमेला सुरूवात करण्यात आली होती. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धा व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर १ मार्चपासून शासनाने ६० वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना लसीकरण करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या होत्या. सध्या जिल्ह्यातील सर्वच केंद्रांमध्ये जेष्ठांचे लसीकरण करण्यात येत होते, परंतु रविवारी (ता. २८) होळीची व सोमवारी (ता. २९) धूलिवंदची शासकीय सुटी असल्यामुळे जिल्ह्यातील ८६ केंद्रातून करण्यात येणाऱ्या कोरोना लसीकरण मोहिमेला दोन दिवसांचा ब्रेक लागला आहे. त्यानंतर मात्र पुर्वरत लसीकरण करण्यात येईल, अशी माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली आहे.
---------------
२५ हजार लसींची मागणी
पहिला डोज घेणाऱ्या जेष्ठांना दुसरा डोज देण्यासाठी व ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना लस देण्यासाठी शासनाकडे २५ हजार लसींची मागणी जिल्हा आरोग्य विभागाने केली आहे. असे असले तरी सध्या जिल्ह्यात १८ हजार ६००च्या जवळपास लसी उपलब्ध असल्याची माहिती आहे.
---------------
ग्रामीणमध्ये सर्वाधिक लसीकरण केंद्र
सध्या जिल्ह्यात ८६ लसीकरण केंद्रातून कोरोनाची लस देण्यात येत आहे. त्यामध्ये मनपा क्षेत्रातील ८, १० खासगी केंद्र, ग्रामीण भागातील ३० प्राथमिक आरोग्य केंद्र, २० उपकेंद्र, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अधिकार क्षेत्रातील ५ ग्रामीण रूग्णालय व उपजिल्हा रूग्णालय, मूर्तिजापूर येथील २ खासगी रूग्णालय व अकोट नगरपालिका क्षेत्रातील २ केंद्रांसह एकूण ८६ केंद्रांवर लसीकरण मोहीम सुरू आहे.
-------------
नव्या टप्प्यासाठी निर्देश अप्राप्त
कोरोना लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र शासनाने ४५ वर्षांवरील नागरिकांना सुद्धा १ एप्रिलपासून कोरोनाची लस देण्याचे जाहीर केले आहे. जिल्ह्यात या वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या अधिक आहे. असे असले तरी शासनाने अद्याप आरोग्य विभागाला तिसऱ्या टप्प्यातील मोहीमेसाठी मार्गदर्शक तत्वेच जारी केली नाहीत. त्यामुळे आरोग्य विभागाने या लसीकरणाच्या टप्प्यासाठी अद्याप तयारीच सुरू न केल्याची माहिती आहे.
---------------
जिल्ह्यातील ८६ केंद्रांवर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. परंतु दोन दिवस शासकीय सुट्‍या असल्याने शनिवारी व रविवारी लस देण्यात आली नाही. मंगळवार (ता. ३०) पासून पुन्हा लसीकरण करण्यात येईल. ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यासंदर्भात अद्याप मार्गदर्शक सूचना अप्राप्त आहेत.
- डॉ. मनीष शर्मा, जिल्हा लसीकरण अधिकारी, अकोला

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Israel War मुळे भारतात दारूचा दुष्काळ? उन्हाळ्यात थंड बिअरही मिळणार नाही? उत्पादनावर काय परिणाम होणार

IPL 2026: 'रोहित शर्मा डगआऊटमधून २० ओव्हर पाहू शकत नाही, त्याला...', माजी क्रिकेटरचा मुंबई इंडियन्सला स्पष्ट सल्ला

Gudhipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

Latest Marathi News Live Update : पुण्यात पिरंगुट घाटात कार दरीत कोसळली

Kolhapur Headmaster Tragedy : निलंबनाचे नैराश्य मुख्याध्यापकाने थेट आंब्याच्या झाडाला घेतला गळफास, कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT