Brown sugar worth 50 lakh seized Accused from Akola mother and son crime police  esakal
अकोला

Akola News : 50 लाखाची ब्राऊन शुगर जप्त; आरोपींमध्ये अकोल्यातील माय लेकाचा समावेश

मध्य प्रदेशातील रतलाम पोलिसांनी एका महिलेसह दोन व्यापाऱ्यांना ५०५ ग्रॅम ब्राऊन शुगरसह अटक

सकाळ वृत्तसेवा

अकोला : मध्य प्रदेशातील रतलाम पोलिसांनी एका महिलेसह दोन व्यापाऱ्यांना ५०५ ग्रॅम ब्राऊन शुगरसह अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये अफझल खान (वय २४, रा. अकोट फैल, अकोला, महाराष्ट्र) आणि त्याची आई मल्लिका खातून (वय ५५) यांचा समावेश आहे. कारवाईत जप्त करण्यात आलेल्या ब्राऊन शुगरची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत सुमारे ५० लाख रुपये आहे.

या घटने संदर्भात रतलामच्या स्टेशन रोड पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी किशोर पाटणवाला यांनी माहिती दिली की, त्यांना बसमध्ये हिजाब घातलेली एक महिला आणि लांब केस असलेली एक व्यक्ती इंदूरच्या दिशेने ड्रग्ज घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी फव्वार चौक येथे बस अडवली.

बसची झडती घेतल्यानंतर दोन व्यक्ती अंमलीपदार्थांसह आढळले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून अर्धा किलोपेक्षा जास्त ब्राऊन शुगर जप्त केली आणि एनडीपीएस कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. अधिक तपासादरम्यान, रतलाम पोलिसांना समजले की, अफजलविरुद्ध अकोल्यातील अकोट फैल पोलिस ठाण्यात आधीच एनडीपीएस कायद्यांतर्गत अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याची आई मल्लिका या परिसरात ड्रग्ज विकण्यासाठी ओळखली जाते, असेही रतलाम पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman Nina Kutina: गोकर्ण जंगलाच्या गुहेत सापडलेली रशियन महिला ८ वर्ष स्वयंपाक कशी करायची? मुलींना काय खायला द्यायची?

'26 निष्पापांच्या हत्यांमागे पाकिस्तानचा हात, त्या दहशतवाद्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार'; जम्मूच्या उपराज्यपालांचा कडक इशारा

Walking 10000 Steps: दररोज 10,000 पावले चालल्यास काय होईल? डॉक्टरांनी सांगितले शरीरात दिसणारे 5 बदल

Gokul Milk Politics : आप्पा महाडिकांनी थेट मुश्रीफांनाच घेतलं अंगावर, कारभार चांगला, मग ‘टोकण’ कशासाठी?

Nagpur Crime: कर्जदाराचे अपहरण, जिवे मारण्याची धमकी; सावकारासह चौघांना अटक

SCROLL FOR NEXT