Accident Sakal
अकोला

बुलडाणा : देव दर्शनाहून परतणारे वाहन पलटी; २५ भाविक जखमी

पंढरपूर येथे धार्मिक सप्ताह संपवून गावाकडे परतणारा ४०७ वाहन पलटी होऊन अपघात

सकाळ वृत्तसेवा

देऊळगाव राजा (जि. बुलडाणा) : पंढरपूर येथे धार्मिक सप्ताह संपवून गावाकडे परतणारा ४०७ वाहन पलटी होऊन झालेल्या अपघातात एक महिला गंभीर तर पंचवीस ते तीस भाविक जखमी झाल्याची घटना आज (ता.७) सायंकाळी मेरा खुर्द शिवारात घडली याबाबत अंढेरा पोलिसांनी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला.

याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, जळगाव जामोद तालुक्यातील खांडवी परिसरातील लहान-मोठे 35 ते 40 भाविक पंढरपूर येथे धार्मिक सप्ताह साठी एम एच06 जी 8413 क्रमांकाच्या 407 वाहनाने गेले होते धार्मिक सप्ताह संपवून गावाकडे परत जात असताना आज सायंकाळी चारच्या सुमारास भाविकांच्या वाहनावरील चालकाचा ताबा सुटला व भरधाव 407 वाहन दुभाजकावर आदळून पलटी झाले.

सदर अपघातात फिर्यादी यांच्या पत्नीस डोक्याला जबर मार लागून जखमी झाले व लहान-मोठे पंचवीस ते तीस भाविक जखमी झाले जखमींना चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. सदर अपघात प्रकरणी शिवाजी रामदास गणेश वय 51 राहणार खांडवी तालुका जळगाव जामोद व सरकार तर्फे पोलीस कॉन्स्टेबल भारत पोफळे यांच्या फिर्यादीवरून खंडेराव पोलिसांनी आरोपी वाहनचालक अनिल महादेव गणेश याच्याविरुद्ध निष्काळजीपणाने वाहन चालवून भाविक प्रवाशांच्या जखमी होण्यास कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला पोलीस हेडकॉन्स्टेबल अच्युतराव शिरसाट तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT