अकोला

आमदारांची 'बाहुबली' स्टाइल, भर रस्त्यावर काढले शर्ट

सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा: नेहमी दिल्या जाणारी बिनधास्त आणि बेधडक वक्तव्य आणि वेगळ्या स्टाईलमुळे ओखले जाणारे बुलडाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Buldana Shiv Sena MLA Sanjay Gaikwad) हे आता वेगळ्याच निमित्तानं चर्चेत आलेत. गायकवाड यांनी चक्क स्वतःच्या अंगातील शर्ट काढून रस्त्यावर पडलेलं झाड बाजूला केलंय. गायकवाड यांच्या या 'बाहुबली' स्टाइल सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. (Buldana MLA Sanjay Gaikwad's Bahubali style, striped shirt)

गेल्या दोन दिवसांपासून बुलडाणा जिल्ह्यातील वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. काल सायंकाळपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळं घरावरील पत्रे उडाले तर अनेक दुकानांचे नुकसान झाले. हवेचा वेग जास्त असल्याने अनेक झाडे कोलमडून रस्त्यावर पडली आहेत. शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या पार्श्वभूमीवर संजय गायकवाड हे मतदारसंघातील परिस्थितीची पाहणी करत होते. त्यावेळी त्यांना रायरा डाबा या गावानजीक रस्त्यावर झाड पडलेलं दिसलं. त्यामुळं गायकवाड यांनी इतर कर्मचाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना संपर्क करून वेळ न गमावता स्वतः आपलं शर्ट काढून सहकाऱ्यांच्या मदतीनं हे झाड बाजूला केलं.

काही महिन्यांपूर्वी राजूर घाटामध्ये भला मोठा दगड रस्त्यावर पडल्यानं अनेक वाहनांना अडथळा निर्माण होत होता. तो दगडही गायकवाड यांनी स्वतः बाजूला केला होता. आज त्यांनी हे झाड बाजूला केलं. गायकवाड यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ते सध्या 'बाहुबली' म्हणून चर्चेत आलेत.

संपादन - विवेक मेतकर

Buldana MLA Sanjay Gaikwad's Bahubali style, striped shirt

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT