सामाजिक कार्यकर्ते गंगाधर बळीराम तायडे sakal
अकोला

बुलडाणा : रस्त्याच्या संरक्षक भिंतीसाठी समाधी आंदोलन

पलढग कोमलवाडी येथील सामाजिक कार्यकर्त्याचा आक्रमक पवित्रा

शाहीद कुरेशी

मोताळा : मोताळा तालुका लगतच्या बोरखेड ते पलढग (कोमलवाडी) या रस्त्यावरील संरक्षक भिंतीजवळ पावसामुळे रस्ता खचला आहे. या रस्त्याला तातडीने संरक्षक भिंत बांधण्यात यावी, या मागणीसाठी पलढग (कोमलवाडी) येथील सामाजिक कार्यकर्ते गंगाधर बळीराम तायडे यांनी गुरुवारी (ता.१४) सकाळी अकरा वाजता या रस्त्यावर स्वतःला मानेपर्यंत जमिनीत गाडून घेत समाधी आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे प्रशासनाची एकच तारांबळ उडाली आहे.

बोरखेड ते पलढग (कोमलवाडी) या रस्त्यावरील संरक्षक भिंतीजवळ पावसामुळे रस्ता खचला असून, काही शेतकऱ्यांनी शेतात साचलेले पाणी काढण्यासाठी आपापल्या शेतातील रस्त्यामध्ये मोठ्या नाल्या खोदल्या आहेत. त्यामुळे गावात दुचाकी व चारचाकी वाहन येण्यास अडथळा निर्माण झाला आहे. सोबतच शाळकरी विद्यार्थ्यांना रस्त्याअभावी शाळेत जाणे शक्य होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे.

बुलडाणा जिल्हा हा मातृतीर्थ जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. मात्र कोमलवाडी पलढग येथील जिजाऊंच्या लेकींवर एवढा मोठा अन्याय होत आहे. तरी, संबंधित शेतकऱ्यांवर कारवाई करून तातडीने रस्ता चांगला करून देण्यात यावा. तसेच खचलेल्या रस्त्याला संरक्षक भिंत बांधून देण्यात यावी, अशी मागणी पलढग (कोमलवाडी) येथील सामाजिक कार्यकर्ते गंगाधर बळीराम तायडे यांनी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग, जि. प. बुलडाणा यांना सहा जुलै रोजी निवेदनातून केली होती.

सदर मागणी आठ दिवसात पूर्ण न झाल्यास गुरुवारी (ता. १४) विद्यार्थी व पालकांना सोबत घेऊन उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला होता. दरम्यान, प्रशासनाने या मागणीची कोणतीच दखल घेतली नाही. त्यामुळे गंगाधर तायडे यांनी गुरुवारी सकाळी अकरा वाजता या रस्त्यावर स्वतःला मानेपर्यंत जमिनीत गाडून घेत समाधी आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, विद्यार्थी व पालकांनी आंदोलनस्थळी हजेरी लावून या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.

यावेळी आंदोलनकर्त्यासह समर्थकांनी प्रचंड घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला. त्यामुळे प्रशासनाची एकच तारांबळ उडाली आहे. दरम्यान, प्रशासकीय अधिकारी व पोलिसांनी आंदोलनस्थळी धाव घेतली असून, आंदोलनकर्त्या सोबत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

बाबो... सहा चेंडूंत सहा विकेट्स! इंग्लिश गोलंदाजाचा भीमपराक्रम, १६ धावांत घेतले ७ बळी, संघाला मिळवून दिला ११६ धावांनी विजय

PBKS vs RR Live: स्टॉयनिसने लाज वाचवली! पंजाबला दोनशेपार पोहोचवले; राजस्थानच्या गोलंदाजांनी केला होता करेक्ट कार्यक्रम

SCROLL FOR NEXT