buldhana monsoon update kharif crops affect climate change Sakal
अकोला

Monsoon Update : पावसाळा चार महिन्यांचाः पाऊस पडतो केवळ ५० ते ५५ दिवस; बुलडाणा जिल्ह्यात हवामान बदलाचा खरिपाला फटका

हवामान बदलाचे विपरीत परिणाम शेती आणि शेतकऱ्यांना सातत्याने भेडसावत आहेत. त्यातही पाऊस हा फॅक्टर सर्वाधिक जबाबदार ठरतो आहे.

पंजाबराव ठाकरे

संग्रामपूर : हवामान बदलाचे विपरीत परिणाम शेती आणि शेतकऱ्यांना सातत्याने भेडसावत आहेत. त्यातही पाऊस हा फॅक्टर सर्वाधिक जबाबदार ठरतो आहे. पावसाळ्याचे चार महिन्यात केवळ ५० ते ५५ दिवसच पाऊस होत असल्याने जोराचा पाऊस, खंड अशा समस्या उदभवत आहेत. शिवाय अवकाळी पावसाचेही प्रमाण कमालीचे वाढले आहे.

बुलडाणा जिल्हयात मागील पाच वर्षातील पावसाचे प्रमाण लक्षात घेतले तर पाऊस सरासरीच्या ९० टक्क्यांवर पाऊस होत आहे. परंतु असमतोल पावसाने चिंता वाढवल्या आहेत. पावसाळ्याचे चार महिने म्हणजेच १२० दिवस राहतात.

या काळात समतोल स्वरुपाचा पाऊस झाला तर खरीप हंगाम चांगल्यापैकी साधू शकतो. मागील काही वर्षात हे चक्र पुर्णपणे बदलले आहे. आता पावसाळ्यात पाऊस सरासरीपर्यंत जातो. मात्र, या पावसाचे दिवस हे इतके असमतोल झालेले आहेत की पाऊस पडला तर तासाभरात ढगफुटीसदृश्‍य होतो.

सर्वत्र नदी-नाले ओसंडून वाहू लागतात. एकाच शिवारात काही अंतरावर अशा प्रकारचा पाऊस पडलेलाही नसतो, अशी विचित्र परिस्थिती अनेक गावात शेतकरी अनुभवतात. खरिपात पाऊस पडल्यानंतर पेरण्या होत असतात.

पण हा पाऊस आता मृग नक्षत्रात पुरेसा येत नसल्याने पेरण्याही सुरु होत नाहीत. कधी कधी पेरणी जुलैच्या अखेरपर्यंत होते. काही भागात आॅगस्टमध्येही पेरणी धरली जाते. या उशिराने होणाऱ्या पेरणीमुळे मूग, उडदासारखे कमी कालावधीचे पिक क्षेत्र सातत्याने घटू लागले आहे.

तसेच सुरुवातीला पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना जून-जुलैतील पावसाच्या खंडाचा फटका बसतो. दुबार पेरणीही करावी लागते. सोयाबीनसारख्या प्रमुख पिकाच्या कमी व अधिक कालावधी घेणाऱ्या वाणांच्या लागवडीवरही परिणाम होतो आहे.

पाऊस हा पीक काढणीच्या काळात अधिक झाल्याने शेतकऱ्याच्या उत्पादनाचे नुकसान, शेतमालाचा दर्जा खालावण्यासारखे प्रकार दरवर्षी होऊ लागले आहेत. अशा या विचित्र पाऊस मानाचा फटका सतत बसत असल्याने शेतकऱ्याचे अर्थकारण बिघडत आहे. सोयाबीनसह इतर विविध पिकांचे उत्पादन कमी होत आहे. पावसावर आधारीत या शेतीपद्धतीसमोर हवामान बदलाचे मोठे आव्हान उभे ठाकलेले आहे.

वर्ष झालेला पाऊस दिवस

२०१९-२० ६९७ (९२ टक्के) ५४

२०२०-२१ ७८६ (१०३ टक्के) ५६

२०२१-२२ ८६४ (११३ टक्के) ५३

२०२२-२३ ८१०(१०६ टक्के) ५६

२०२३-२४ ६९० (९१ टक्के) ५१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Pune Metro: पुणेकरांना मोठा दिलासा! विमानतळाला मेट्रोची थेट जोडणी, कर्वे रस्त्यावर दुमजली उड्डाणपूल; मोहोळ यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT