car rammed into hotel and the worker who was filling the water lost his life Sakal
अकोला

Akola Car Accident : कार हॉटेलात घुसली अन् पाणी भरत असलेल्या कामगाराने गमावला जीव

Akola Car Accident Case : अल्टो कार चालकाने त्याच्या ताब्यातील कार भरधाव व निष्काळजीपणे चालवुन जुन्या बस स्थानकावरील एका हॉटेलमध्ये कार घुसवली.

सकाळ वृत्तसेवा

Akola News : स्थानिक पोलिस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हॉटेलमध्ये कार घुसल्याने पाणी भरत असलेल्या कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एम.एच. ३२ वाय २४६५ क्रमांकाच्या मारुती अल्टो कार चालकाने त्याच्या ताब्यातील कार भरधाव व निष्काळजीपणे चालवुन जुन्या बस स्थानकावरील एका हॉटेलमध्ये कार घुसवली. तेवढ्यात कार समोर पाणी भरण्यासाठी जाणारा कामगार कार खाली चिरडला गेला.

सुरुवातीला त्याला स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी भरती करण्यात आले मात्र प्रकृती गंभीर असल्याने अकोला येथे उपचारासाठी हलवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अभिजीत शिंदे (रा. भंडाराज ता. पातूर) असे मृतकाचे नाव आहे.

हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगाराची कोणतीही चूक नसताना कारचालकाच्या चुकीमुळे आपला प्राण गमवावा लागला अशा प्रकारच्या प्रतिक्रिया घटनास्थळी नागरिकांनी व्यक्त केल्या. या प्रकरणी वाहन पोलिसांनी चालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस पोहोचेपर्यंत कारचालक पसार

घटनास्थळी पोलिस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर आहे. अपघातातील मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कारचालकास घटनेनंतर काही नागरिकांनी पकडून ठेवले होते. मात्र पोलिस पोहोचेपर्यंत आरोपी पसार झाला, असे पातूर पोलिसांनी सांगितले. हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी जर पोलिस वेळेत पोहोचत नसतील तर पातूर पोलिस किती कर्तव्यदक्ष आहेत याचा अंदाज येऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime : निर्माल्य विसर्जनानंतर पतीसोबत काढला 'सेल्फी' अन् महिलेने नदीत मारली उडी; दोघांत असं काय घडलं?

'मुंबई फक्त परप्रातियांमुळे, नाहीतर मराठी लोकांची परिस्थिती बिकट' प्रसिद्ध अभिनेत्रीच वादग्रस्त वक्तव्य, ट्रोल होताच मागितली माफी

उत्तर भारतात पुन्हा विमान अपघाताची शक्यता? ज्योतिषाचार्यांनी शेअर मार्केटचं ही वर्तवलं भविष्य

Latest Maharashtra News Updates : घाटकोपर-वर्सोवा मेट्रो सेवा २० मिनिटे ठप्प, प्रवाशांचा संताप

M S Dhoni Video : मोजक्या मित्रांसह धोनीने साजरा केला ४४वा वाढदिवस, माहीच्या बर्थडे सेलिब्रेशनचा खास व्हिडीओ पाहाच..

SCROLL FOR NEXT