Central Investigation Agency Andhra Pradesh sakal
अकोला

‘एनआयए’ने बुलडाण्यातील युवकाला घेतले ताब्यात; दहशतवाद्यांशी संबंध

आंध्र प्रदेश राज्यातील केंद्रीय तपास संस्था तपास करत थेट राज्यातील बुलडाणा जिल्ह्यात पोचली

सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा : आंध्र प्रदेश राज्यातील एनआयए (केंद्रीय तपास संस्था) २०२० मध्ये झालेल्या एका प्रकरणात तपास करत थेट राज्यातील बुलडाणा जिल्ह्यात पोचली आहे. यासोबतच गुजरातमध्येही यासंदर्भात तपास करत गोधरा येथे छापा मारला. दहशतवाद्यांसोबत संबंध असल्याचा संशय व्यक्त करत बुलडाणा जिल्ह्यातून एकाला ताब्यात घेतले आहे. यामुळे जिल्ह्यात खळबळ निर्माण झाली आहे.

एनआयए पथकाकडे जानेवारी २०२० मध्ये झालेल्या एका प्रकरणाचा तपास फेब्रुवारी २०२१ मध्ये आंध्र प्रदेश पोलिसांकडून काढून देण्यात आला होता. त्यानंतर सदर संस्था सातत्याने याप्रकरणी शोधमोहीम राबवीत होती. दरम्यान, हेरगिरीच्या संशयावरून राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने बुलडाणा जिल्ह्यासह गुजरातमधील विविध ठिकाणी छापे मारले.

बुलडाणा जिल्ह्यातील रायपूर पोलिस ठाणे हद्दीतील सोनेवाडी येथून २४ मार्चला सकाळी ७ दरम्यान एका २४ वर्षीय युवकाला ताब्यात घेतले आहे. या अगोदरही याच तपासात एनआयए पथक बुलडाणा जिल्ह्यात येऊन गेल्याची गोपनीय माहिती समोर आली आहे. दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी एनआयएकडून आंध्र प्रदेशमध्ये जानेवारी २०२० मध्ये गुन्हा दाखल केला होता. त्याप्रकरणी बुलडाणा आणि गुजरातमधील गोधरा येथील चार ठिकाणी छापे मारले. संशयास्पद सिमकार्ड, कागदपत्रे व इतर डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आल्याची माहिती एनआयएने दिली आहे.

भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी पाकिस्तानी गुप्तहेरांनी विशाखापट्टणम, मुंबई आणि गोव्यातील आरोपींसोबत कट रचल्याचे आतापर्यंतच्या तपासात उघडकीस आले आहे. याच प्रकरणाच्या तपासात एनआयएचे पथक बुलडाणा जिल्ह्यात आले. बुलडाणा जिल्ह्यात आलेले एनआयएचे पथक हैदराबाद येथील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT