central Railway Mana to Murtijapur service resumed after nine hours rain akola  sakal
अकोला

Akola Railway : मध्य रेल्वेची माना ते मूर्तिजापूर वाहतूक नऊ तासाच्या अथक प्रयत्नानंतर पुर्ववत

पावसाने गेला होता रुळ वाहून; पहाटे २ वाजताच्या सुमारास सुरळीत झाली

सकाळ वृत्तसेवा

माना/मूर्तिजापूर (जि.अकोला) : जिल्ह्यातील माना ते मूर्तिजापूर दरम्यान जितापूरजवळ मध्य रेल्वेच्या मुंबई-हावडा मार्गावरील रुळाखालील भराव पावसाच्या पाण्याने सोमवारी वाहून गेला होता. रेल्वे कर्मचाऱ्यांनी रात्रीतूनच अथक परिश्रम करीत अवघ्या नऊ तासात पुन्हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला. त्यामुळे या मार्गावरील दोन्ही कडील वाहतूक पहाटे २ वाजताच्या सुमारास सुरळीत झाली.

अकोला जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे मध्य रेल्वेच्या माना ते मूर्तिजापूर रेल्वे मार्गावरील जितापूर जवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचले. या ठिकाणा भुयारी मार्गाचे काम देखील सुरू आहे.

साचलेले पाणी रुळाखालून वाहून गेले. त्या पाण्यासोबत गिट्टीदेखील वाहून गेल्याने रुळाचा काही भाग हा अधांतरी झाला होता. वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने मध्य रेल्वेची अप आणि डाऊन वाहतूक थांबवण्यात आली होती.

त्यामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून पडले. दुरुस्तीचे कार्य सोमवारी रात्री ८.३० वाजतापासून युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत हे कार्य सुरू होते. पहाटे २ वाजताच्या सुमारास हे काम पूर्ण झाले. त्यानंतर धिम्या गतीने रेल्वे सेवा सुरू करण्यात आली होती. पहाटेपर्यंत दोन्ही कडील मार्ग वाहतुकीसाठी खुले करण्यात आले.

चार ते पाच तास उशिरा धावल्यात गाड्या

अकोला जिल्ह्यात रुळाखालील भराव वाहून गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक थांबविण्यात आली होती. त्यामुळे दोन्ही कडील काही गाड्यांचा मार्ग वळविण्यात आला होता तर काही गाड्या भुसावळ, बडनेरा व नागपूर येथे थांबविण्यात आल्या होत्या. भुसावळकडून नागपूरकडे जाणाऱ्या गाड्या सुमारे एक ते दोन तास उशीरा धावत आहेत तर नागपूरकडून भुसावळकडे धावणाऱ्या गाड्यांना चार ते पाच तास विलंब झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीएसटीच्या नियमांमध्ये होणार मोठा बदल, आता विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा खरेदीदाराला नाही, विधी समितीने 'त्या' प्रस्तावाला दिली मंजुरी

Kothrud Assault: कोथरूडमध्ये जुन्या वादातून तरुणावर स्टंपने बेदम मारहाण; मध्यस्थ नागरिकांनाही धमक्या

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

Marathi Books: इतिहास, कविता, धर्म आणि काश्मीर सफर; चार नवी पुस्तके.. वाचनविश्वात नव्या पानांची भर

गडचिरोलीत पुन्हा माओवादी हालचालींची चाहूल? कुंडमजवळ बॅनर-पत्रके आढळली; नेमकं काय लिहिलंय?

SCROLL FOR NEXT