Washim ZP Sakal
अकोला

वाशीम जिल्ह्याला उत्कृष्टता प्रमाणपत्र पुरस्कार

जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धा, पालकमंत्र्यांनी केले जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन

सकाळ वृत्तसेवा

वाशीम - केंद्रीय कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्रालयाच्या ‘जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धा २०२०-२१’ मध्ये वाशीम जिल्ह्याला उल्लेखनीय कार्यासाठी दिल्ली येथे ‘उत्कृष्टता प्रमाणपत्र पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आल्याने पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा प्रशासन, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे अभिनंदन केले आहे. वाशीम जिल्हा कौशल्य नियोजन आराखड्यात कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचा समावेश करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे. या पुढच्या काळात वाशीम जिल्हा अव्वल दर्जाची कामगिरी करेल, असा विश्वासही पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

वाशीम हा आकांक्षीत जिल्हा आहे. जिल्ह्याचा मुख्य घटक शेती आहे. जिल्ह्यातून ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ जात असल्याने बांधकाम क्षेत्रात तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. केंद्र शासनाच्या ‘संकल्प’ कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील महिलांसाठी बेकरी, पाककला आणि शेळीपालन प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला.

यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री म्हणून वेळोवेळी आढावा घेऊन जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले होते. त्यामुळे वाशीम जिल्ह्याचा सन्मान जिल्हा प्रशासनाला प्रोत्साहन देणारा आहे, असे पालकमंत्री देसाई यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी केंद्रीयस्तरावर सन्मान झालेल्या सातारा, सिंधुदुर्ग, ठाणे आणि सोलापूर जिल्हा प्रशासनाचेही अभिनंदन केले.

दिल्ली येथील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरच्या नालंदा सभागृहात केंद्रीय कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्रालयाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात मंत्रालयाचे सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धेचे’ (२०२०-२१) पुरस्कार प्रदान करण्यात आले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या देशभरातील ४६७ जिल्ह्यांतून विजयी ठरलेल्या ३० जिल्ह्यांना एकूण तीन श्रेणींमध्ये यावेळी गौरविण्यात आले.

महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांना तीन श्रेणीत पुरस्कार प्रदान करण्यात आले. या स्पर्धेत देशभरातील ४६७ जिल्ह्यांनी सहभाग घेऊन आराखडा सादर केला होता. केंद्रीय कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्रालयाने पुरस्कार निवडीसाठी दिल्ली आणि खरगपूर आयआयटीच्या तज्ज्ञांची नेमणूक केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon Protest : मोठी बातमी ! मालेगाव अत्याचार प्रकरणी जनआक्रोश मोर्चाला हिंसक वळण, आक्रमक आंदोलक गेट तोडून कोर्टात घुसले

Donald Trump: साडेतीनशे टक्के शुल्क लावणार होतो; ट्रम्प यांच्याकडून संघर्ष थांबविल्याचा पुनरुच्चार

Google Maps Offline: इंटरनेटशिवाय Google Map कसं वापरायचं? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स अन् ट्रिक

Latest Marathi News Live Update : २००२ च्या तरतुदींनुसार अंदाजे १०८ कोटी रुपये किमतीचा १.३५ एकरचा व्यावसायिक भूखंड तात्पुरता जप्त केला आहे- ईडी

Viral Video Teacher : शाळेतच मुख्याध्यापकाचा इंग्लिश नजराणा! प्रार्थना सुरू असताना कांबळे सर टल्ली होऊन नाचू लागले अन् व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

SCROLL FOR NEXT