Chance of rain for next five days Weather forecast akola monsoon biporjoy cyclone esakal
अकोला

Monsoon Update : पुढील पाच दिवस पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

तापमानातही होणार घट; हा पाऊस पूर्व मोसमी पाऊस असेल

सकाळ वृत्तसेवा

अकोला : मॉन्सून महाराष्ट्राच्‍या दिशेने वेगाने येतो आहे. त्यातच चक्रीवादळही मुंबई किनारपट्टीच्या दिशेने येत आहे. त्यामुळे वाऱ्याचा वेग वाढला आहे. परिणामी पुढील पाच दिवस अकोला जिल्ह्यात ३० ते ४० किलोमीटर वेगावे वारे वाहणार असून, मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यताही नागपूर वेदशाळेने (हवामान खाते) वर्तविली आहे.

मृगनक्षत्राला सुरुवात होऊनही मॉन्सूनचा पत्ता नाही. कधी येणार याबाबत दररोज नवे अंदाज येत असतानाच तापमानात वाढ होताना दिसत आहे. मात्र, हवामान विभागानुसार आता आनंदाची बातमी असून, पुढील पाच दिवस अकोल्यासह विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याच शक्यता आहे. मात्र, हा पाऊस पूर्व मोसमी पाऊस असेल.

अकोल्यासह विदर्भात मॉन्सून दाखल होण्यास साधारणपणे १५ जूनच्या‎ आसपासाचा मुहूर्त साधल्या जाण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचे केरळमध्ये आगमन झाल्याने लवकरच तो राज्यातही दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमान वाढत असताना हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पाऊस झाल्यास शेतीच्या कामांना वेग येऊ शकतो.

अनेक ठिकाणी मॉन्सूनपूर्व कपाशीची लागवड

अकोला जिल्ह्यात मॉन्सून सुरू होण्यास १५ जूननंतरचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. असे असले तरी अकोला जिल्ह्यातील सिंचनाची सुविधा असलेल्या भागात शेतकऱ्यांनी मॉन्सूसपूर्व कपाशीची पेरणी केली आहे.

यात प्रामुख्याने तेल्हारा, अकोट, बार्शीटाकळीतील काही भागाचा समावेश आहे. या शेतकऱ्यांना आता मॉन्सूनच्या पावसाची प्रतीक्षा आहे. त्यापूर्वी मॉन्सपूर्व पाऊस पडण्याची शक्यता असल्याने या शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो.

काय म्हणतो हवामानाचा अंदाज?

नागपूर वेधशाळेने पुढील पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गढचिरोली, गोंदिया, वर्धा, यवतमाळ आणि ननागपूर जिल्ह्यात वेगाने वारे वाहतील. सोबतच मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यताही हवामानाच्या अंदाजात वर्तविण्यात आली आहे. हवामान तज्ञांनाही विदर्भात १० जूननंतर पावसाची शक्यता वर्तविली होती.

वाऱ्याचा वेग वाढला, तापमान घटले

अकोला जिल्ह्यात सलग दोन दिवस ४३ अंश सेल्सिअस तापमान नोंदविल्या गेले होते. शुक्रवारी तर पारा त्याही पुढे गेला होता. मात्र, शनिवारी वाऱ्याचा वेग वाढताच तापमानात घट नोंदविल्या गेली. अकोला जिल्ह्यातील शनिवारचे कमाल तपमान ४२.८ अंश सेल्सिअस नोंदविल्या गेले. रात्रीच्या तामानात मात्र वाढ झाली असून, किमान तापमान ३०.४ अंश सेल्सिअस नोंदविल्या गेले.

पेरणीची घाई ठरू शकते घातक!

अकोला जिल्ह्यात अद्याप मॉन्सूनला सुरुवात झाली नाही. पुढील पाच दिवस मॉन्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. या पावसात शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची घाई करू नये. किमान १०० मि.मि. पाऊस झाल्याशिवाय पेरणी करणे धोक्याचे व नुकसानकारक ठरेल, असा इशारा कृषी तज्ञांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT