changes in transport on durga visarjan dhammachakra know alternate route akola traffic police sakal
अकोला

Akola News : विसर्जन, धम्मचक्र प्रवर्तनदिनी वाहतुकीत बदल

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; दोन दिवस नागरिकांना निवडावा लागेल पर्यायी मार्ग

सकाळ वृत्तसेवा

अकोला : शहर व ग्रामीण परिसरातील दुर्गा विसर्जन गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या पुलावर व बाळापूर येथील भिकुंड नदीच्या पुलावर ता. २५ ऑक्टोबरला होईल. याचदिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मिरवणूक व अकोला क्रिकेट क्लबच्या मैदानात सभाही होणार आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.

ता. २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वा. पासून ते ता. २६ ऑक्टोबरच्या सकाळी ६ वा. पर्यंत शहरात, तसेच अकोट- अकोला राज्यमार्ग व पारस फाटा- बाळापूर मार्गावर सुव्यवस्थित रहदारीसाठी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांनी या संदर्भातील आदेश जारी केला.

अकोला शहरातील पर्यायी मार्ग

• डाबकी रोडमार्गावरील वाहतूक किल्ला चौक, हरिहर पेठ, वाशीम बायपास चौक, राष्ट्रीय महामार्गाने वळविण्या आली.

• बसस्थानक चौक ते डाबकी रोड मार्गावरील वाहतूक पोस्ट ऑफिस चौक, सिव्हिल लाईन चौक, नेहरू पार्क मार्गे वाशीम बायपास चौक, हरिहर पेठ मार्गे वळविण्यात आली.

• रेल्वे उड्डाण पूल ते अकोट स्टँड व बस स्थानक मार्गवरील वाहतूक रेल्वे ओव्हर ब्रिज, रेल्वे स्टेशन चौक, अग्रसेन चौक, उड्डाण पुलावरून जेल चौक मार्गे वळविण्यात आली.

• अकोला ते अकोटकडे जाणारी वाहतूक व अकोटहून अकोल्याकडे येणारी वाहतूक वाशीम बायपास चौक, शेगाव टी पॉईंट, गायगाव, निंबा फाटा, देवरी मार्गे वळविण्यात आली.

• अकोला बसस्थानकावरून म्हैसांगमार्गे दर्यापूरकडे व दर्यापूरहून अकोल्याकडे येणारी वाहतूक वाशीम बायपास चौक, देवरी अकोट मार्गे दर्यापूर या मार्गाने वळविण्यात आली आहे.

• पारस फाटा– बाळापूर– खामगाव मार्गावरील वाहतूक पारस फाटा, हायवे ट्रॅफिक कार्यालयाकडून बाळापूरकडे वळविण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचा अमित शहांना थेट सवाल; पत्र लिहून मागितले उत्तर

आदिती तटकरेंचं लाडक्या बहिणींबाबतचं विधान चर्चेत, म्हणाल्या, ''पैसे दिले की महिला...''

Commonwealth Games : भारताच्या मिराबाई चानूने इतिहास घडवला! सलग तिसऱ्यांदा जिंकलं सुवर्णपदक

विद्यार्थी आंदोलन झालं, पण आता पुढं काय? कॉकरोच जनता पार्टीनं स्पष्ट केली भूमिका

Nepal New Coin: नेपाळचा मोठा निर्णय! नव्या एक रुपयाच्या नाण्यावर वादग्रस्त नकाशा छापणार; भारताने आधीच घेतला होता आक्षेप

SCROLL FOR NEXT