Handwriting file photo
अकोला

ऑनलाईन मुळे बिघडले मुलांचे हस्ताक्षर

लिहण्याची गतीही मंदावली

विवेक मेतकर

शिरपूर जैन (जि.वाशीम) ः गतवर्षापासून कोरोनामुळे शाळा, महाविद्यालय बंद आहेत. त्याला पर्याय म्हणून ऑनलाईन शिक्षणावर भर दिला जात आहे. यामध्ये दीड वर्षापासून केवळ मोबाईलचा उपयोग करून ऑनलाईन शिक्षण होत आहे. लिहिण्याची सवय नसल्याने विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर कमालीचे बिघडत चालले आहे.

वळणदार अक्षर येत नसून लिहिण्याची गती ही मंदावली आहे. पालक वर्गही याकडे फारसा लक्ष द्यायला तयार नसल्याने विद्यार्थी देखील दुर्लक्ष करीत आहेत. दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा जवळ आल्या असून, परीक्षेतील सर्व प्रश्न सोडविता येणार की नाही? याची चिंता विद्यार्थ्यांसह पालकांना लागली आहे.

प्रश्न, उत्तरे व गृहपाठ लिहिण्याची सवय राहिली नसल्याने, लेखी परीक्षेला अडचण येणार आहे. मूल्यमापन लेखी परीक्षेवर होत असल्याने लेखी पेपर सोडवण्यासाठी तीन तासाच्या काळात पेपर देण्यासाठी हा सराव गरजेचा आहे. ऑनलाईन मुळे सुटत असलेली लिखानाची सवय परत होण्यासाठी शिक्षक व शाळांनी लेखी सराव करून घेतल्यास ही अडचण दूर होईल.

संपादन - विवेक मेतकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Mataram: ''राजेंद्र प्रसाद यांनी मोठी चूक केलेली'', वंदे मातरम् बिल मंजूर झाल्यानंतर खासदार ओवैसींचं वादग्रस्त विधान

Balen Shah: पंतप्रधान बालेन शाह घटनात्मक परंपरा मोडत आहेत! नेमके आरोप काय? नेपाळच्या राजकारणात नवा वाद

Commonwealth Games 2026: भल्याभल्यांना टक्कर दिली, भारताची २० वर्षांची वाघिण जगाला भिडली! कोण आहे मार्टिना देवी मैबाम? थोडक्यात हुकले पदक

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; १० जिल्ह्यांना IMDचा रेड अलर्ट, पुढील ४८ तास अतिवृष्टीचा धोका

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT