Class I to XII, should be the stages of education akola marathi news 
अकोला

इयत्ता पहिली ते बारावी, असे असावेत शिक्षणाचे टप्पे

सकाळ वृत्तसेवा

अकोला :  कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्शभूमीवर ऑनलाइन अध्यापन हा पर्याय नाही तर पुरक आहे. त्यामुळे त्यादृष्टीने नियोजन करून त्याचा वापर करावा. नवीन शैक्षणिक सत्र सुरू करताना वयोगटाचा विचारकरून टप्प्‍याने शाळा सुरू करावी आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात यावी, अशा सूचना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदच्या अभ्यास गटाने राज्य सरकारला सादर केलेल्या प्रारूपातून केल्या आहेत.


नवीन शैक्षणिक सत्र सुरू करण्यापूर्वी करावयाच्या उपाययोजनांबाबत सरकारने सूचना मागविल्या होत्या. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदने त्यासाठी अभ्यास गट तयार केला. या अभ्यास गटाने राज्यातील शिक्षक परिषद पदाधिकारी शिक्षक, मुख्याध्यापक यांच्याकडून माहिती संकलित केली. त्याआधावर तयार केलेले प्रारूप सकारला सादर केले. त्यात विविध सूचना मांडण्यासोबतच शैक्षणिक सुधारणाही सूचविण्यात आल्या आहेत. या प्रारुप समितीमध्ये राज्य भरातील शिक्षकांचा समावेश होता, अशी माहिती संघटनेचे अकोला जिल्हाध्यक्ष अतुल पिलात्रे यांनी दिली.

या सूचनांचा समावेश
- अनुरूप परिस्थिती निर्माण झाल्यावरच टप्प्या टप्प्याने सत्र सुरू करावे .
- इयता १ ते ५, ६ ते ८, ९ ते १२ व महाविद्यालयीन असे टप्पे असावेत .
- पूर्व प्राथमिक शाळा शक्यतो सुरू करू नयेत .
- नवीन प्रवेश आरटीई नुसार व केंद्रीय पद्धतीने करावे .
- शाळा महाविद्यालयातील भौतिक सुविधा, सॅनिटायझर व मास्क पुरवण्यात यावेत .
- शाळा महाविद्यालयाच्या कार्यालयाची कामकाजाची वेळ सकाळी ९ ते दुपारी ४ असावी.
- बैठक व्यवस्था करताना एका वर्गात २० ते २५ विद्यर्थी असावेत.
- बैठक व्यवस्था बघून एक दिवस आड विद्यर्थ्याना शाळेत बोलवावे.
- आवश्यकतेनुसार शिक्षक पदे मंजूर करावेत.
- प्रत्येक शाळेत महाविद्यालयात एक शारीरिक शिक्षण शिक्षक असावा.
- नियोजित अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे बंधन असू नये .
- इयत्ता निहाय क्षमता विकसित करण्याचे काम शिक्षकांनी करावे 
- अध्यापनाच्या कार्यासाठी सुट्ट्यांचा कालावधी कमी करावा.
- अध्यापनातून विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक क्षमता निर्माण करण्यासाठी स्वाध्याय प्रक्रियेचा वापर करावा.
- ऑनलाईन अध्यापन हा पर्याय नसून तो पूरक आहे त्यप्रमाणे त्याचा वापर व्हावा.
- मध्यान्ह भोजन व्यवस्था शैक्षणिक सत्रापुरती स्थगित ठेवावी .
- एकाच परीसरातील शाळा कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून शाळा भरणे व सुटण्याची वेळ यामध्ये अंतर असावे.
- सत्राच्या सुरुवतीला सर्वांची (शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी विध्यार्थी ) कोरोना रॅपीड टेस्ट घ्यावी .
- शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी , विध्यार्थी यांचा विमा काढण्यात यावा .
-या शैक्षणिक वर्षात शिक्षकांना अतिरिक्त करू नये.
- इयता १२ वीचा चालू वर्षाकरिता जुनाच अभ्यासक्रम ठेवावा.
- नवीन शिक्षक भरती बंदीतून आरोग्य विभागाप्रमाणे शिक्षण विभागाला वगळावे .
- शिक्षणातील खालील प्रलंबित ज्वलंत समस्या तत्काळ निकाली काढाव्यात.
- शिक्षकांच्या समस्या निकाली काढण्यात याव्यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

Nagpur News : आई-बाबा मला माफ करा; तरुण अधिवक्‍त्याने गळफास घेऊन संपविले जीवन

Empress Garden : एम्प्रेस गार्डनच्या जागेवर न्यायालयीन बांधकामास विरोध; १३४ वर्षांचा ऐतिहासिक वारसा उद्ध्वस्त करण्याचा डाव

Gyanesh Kumar Impeachment : मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोग चालवण्याची तयारी! ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत वाढ? विरोधी पक्ष संसदेत मांडणार प्रस्ताव!

IND vs WI, Live Streaming: भारत-वेस्ट इंडिज संघात ३ वनडे अन् ५ टी२० सामन्यांचा रोमांच! कधी, कुठे अन् किती वाजता पाहाणार मॅच?

SCROLL FOR NEXT