Ladki Bahin Yojna esakal
अकोला

VIDEO : धक्कादायक! लाडकी बहीण याेजनेच्या कागदपत्रांसाठी पैसे घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल, तलाठ्याकडून मागवला खुलासा

संबंधित कथित तलाठ्याकडून खुलासा मागवण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यात येत आहेत.

अकोला : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) लाभ मिळावा, यासाठी कागदपत्रे मिळण्याकरिता पैसे घेत असल्याचा प्रकार मंगळवारी समाेर आला आहे. उत्पन्नाच्या प्रमाणपत्राच्या अहवालासाठी तलाठी कार्यालयात पैसे घेत असल्याच्या व्हिडिओची क्लिप मंगळवारी व्हायरल झाली. याप्रकरणी महसूल विभागाने चाैकशीची प्रक्रिया सुरु केली. संबंधित कथित तलाठ्याकडून खुलासा मागवण्यात आला आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. योजनेंतर्गत सरकार २१ ते ६० वर्षे वयोगटातील महिलांना दरमहा १५०० रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येईल. त्यामुळे महिलांची दस्तऐवज गोळा करण्यासाठी सरकारी कार्यालयांत गर्दी होत आहे. योजनेसाठी पात्रतेचे निकषही निश्चित करण्यात आले आहेत.

यात लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे, विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला, अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बैंक खाते असणे, लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम अडीच लाखांपेक्षा लाखांपेक्षा जास्त नसावे आदींचा समावेश आहे. दरम्यान शहरातील एका तलाठी कार्यालयात उत्पन्न दाखल्याच्या अहवालासाठी पैसे घेण्यात येत असल्याची क्लिप व्हायरल झाली. त्यामुळे मंगळवारी अकाेला तहसील कार्यालयाने चाैकशी प्रक्रियेला प्रारंभही केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

SCROLL FOR NEXT