Rape crime against women Representative Image
अकोला

संघातून काढून टाकण्याची धमकी देत मुलींचे लैंगिक शोषण, क्रीडा प्रशिक्षकाला जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा

अकोला, ता. १७ : गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा फासत अल्पवयीन मुलींचे वारंवार लैंगिक शोषण व अन्य एका मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी क्रीडा प्रशिक्षकाला विद्यमान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.डी. पिंपळकर यांच्या न्यायालयाने गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सोबतच तीन लाख १० हजाराच्या दंडही केला.

शुद्धोधन सहदेव अंभोरे हा क्रीडा प्रशिक्षक आहे. तो प्रशिक्षणार्थी अल्पवयीन मुलींना संघातून काढून टाकण्याची धमकी देत वारंवार शरीर संबंध प्रस्तापित करीत होता. यातून अल्पवयीन पीडिता गरोदर झाल्याने क्रीडा प्रशिक्षकाचे प्रताप उघडकीस आले. ता. ३० जुलै २०१८ रोजी एमआयडीसी पोलिस स्टेशनला या संदर्भात अंभोरेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये पीएसआय संजय कोरचे यांनी तपास करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. विद्यमान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.डी. पिंपळकर यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीत सरकार पक्षातर्फे नऊ साक्षीदारांची साक्ष झाली.

याप्रकरणी भांदवी कलम ३७६ (२)(एन) व पॉक्सो कायदा कलम तीन, चार, पाच मध्ये नराधम शुद्धोधन सहदेव अंभोरे याला दोषी ठरवून आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. अन्य एका मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पाच वर्षे कारावास, कलम ५०६ मध्ये दोन वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली. विविध कलमा अंतर्गत एकूण तीन लाख १० हजाराचा दंड ठोठावण्यात आला. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता मंगला पांडे, किरण खोत यांनी बाजू मांडली. एलपीसी अनुराधा महल्ले, सीएमएसचे प्रवीण पाटील यांनी पैरवी अधीकारी म्हणून काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Ayurvedic Prasad: गणेशोत्सवातील प्रसादातून मज्जाधातूचे पोषण; आयुर्वेदानुसार मोदक, पंचामृत, लाडू व लाह्यांचे मेंदूवर्धक गुण

आजचे राशिभविष्य - 11 सप्टेंबर 2026

Haritalika Ritual: हरितालिका व्रताचा खरा अर्थ काय? पार्वतीच्या तपश्चर्येपासून विवाहातील प्रेम, निवड, संयम आणि नात्यांच्या संतुलनापर्यंत

Ayurvedic Treatment: ३५व्या वर्षी हाडे ठिसूळ होऊन वारंवार फ्रॅक्चर का? आयुर्वेदातून काय मदत मिळू शकते; आहार, अभ्यंग आणि उपचाराबाबत जाणून घ्या

Lucky Zodiac Signs : 10 वर्षांनंतर जुळून आला 'त्रिग्रही योग'! 11 सप्टेंबरला मिथुन, धनुसह 5 राशींना लॉटरी लागण्याची शक्यता; जुन्या गुंतवणुकीतूनही मिळणार बंपर परतावा

SCROLL FOR NEXT