Compensate the affected farmers otherwise Swabhimani Shetkari will start agitation 
अकोला

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्या; अन्यथा स्वाभिमानी शेतकरी तीव्र आंदोलन छेडणार

सकाळ वृत्तसेवा

डोणगाव (बुलडाणा) : मेहकर तालुक्यातील बहुतांश गावामध्ये अचानक झालेल्या वारा व गारपिटीमुळे परिसरात आरेगाव, मादणी, डोणगांव, जवळा, अंजनी बुद्रूक या शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे याबाबत शासनाने तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला आहे. 

डोणगांव भाग १ मधील अल्पभूधारक शेतकरी गोपाल कुटे व आरेगाव येथील किरण परशराम साखरे यांच्या शेतातील संपूर्ण पपईची तसेच राम निबांजी वायाळ या शेतकर्‍यांच्या कांदा पिकांचे सुद्धा नुकसान झाले. बर्‍याच शेतकर्‍यांना शासनाने पीक विमा सुद्धा दिलेला नाही. कंपनी शेतकर्‍यांना विमा देण्यासाठी टाळाटाळ करत आहे. मात्र, शासनाने संबंधित कंपनीवर कार्यवाही केलेली नाही. परंतु, शेतकर्‍यांना दिलासा आतातरी द्यावा अशी मागणी केली आहे. 

यावेळी डॉ. टाले यांनी शेतकर्‍यांना सांगितले की, या परिस्थितीत सोबत असून, प्रशासन व शासनाकडून मदत मिळवण्यासाठी तातडीने पाठपुरावा करण्यात येणार आहे. यावेळी शेतकरी गोपाल कुटे, परशराम साखरे, रामेश्वर वायाळ, गजानन वायाळ, कृषी सहाय्यक सुनील बोंद्रे आदी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात उज्वल निकमांची एंट्री; विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Loan EMI Tips: कर्ज लवकर फेडण्यासाठी या 4 स्मार्ट टिप्स फॉलो करा! नवीन लोन घेताना 'या' 10 चुका अजिबात करू नका

Women Health: महिलांना चाळीशीनंतर सतत लघवीला का जावं लागतं? डॉक्टरांनी सांगितली त्यामागची खरी कारणं

Latest Marathi News Live Update : प्रियांका गांधींनी कुंभार समाजाच्या समस्यांबाबत आढावा बैठकीचे अध्यक्षपद भूषवले

Raigad Entrepreneurs Honoured: रायगडचा मान उंचावला; ‘नेक्स्टजेन डिजिटल’चे श्रीकांत जाधव व ‘अलोरवेदा’च्या पूजा खेडेकर यांना राष्ट्रीय ‘एमएसएमई स्टार पुरस्कार २०२६’

SCROLL FOR NEXT