complaints of district president presented before the party inspector Congress leaders Sakal
अकोला

Akola News : पक्ष निरीक्षकांपुढे मांडल्या जिल्हाध्यक्षांच्या तक्रारी! काँग्रेसच्या असंतुष्ट नेत्यांची २ री बैठक

नेत्यांच्या या नाराजीचा सूर प्रदेशाध्यक्षांपर्यंत पोहोचविण्याचे काम पक्ष निरीक्षक करणार

सकाळ वृत्तसेवा

अकोला : काँग्रेसमधील असंतुष्ट नेत्यांनी जिल्हा नेतृत्वाविरुद्ध अकोट येथील बैठकीतून एल्गार पुकारला होता. या मालिकेतील दुसरी बैठक बार्शीटाकळी तालुक्यात महान येथे रविवारी (ता.१७) पार पडली. या बैठकीत पक्ष निरीक्षकांपुढे जिल्हाध्यक्षांच्या कार्यप्रणालीबाबत तक्रारी मांडण्यात आल्यात. आता नेत्यांच्या या नाराजीचा सूर प्रदेशाध्यक्षांपर्यंत पोहोचविण्याचे काम पक्ष निरीक्षक करणार आहेत.

अकोला जिल्हा काँग्रेसमध्ये गेले अनेक दिवसांपासून ज्येष्ठ नेत्यांच्या नाराजीचा सूर उमटला आहे. त्याचा विस्फोट अकोट येथील बैठकीत झाला होता. सरकार क्षेत्रातील नेते व दोन वेळा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले हिदायत पटेल यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांनी अकोटात घडवून आणलेला नाराज नेत्यांचा मेळावा रविवारी महान येथे पुन्हा जमला होता.

नाराजांच्या या मेळाव्यात पक्ष निरीक्षक श्यामबाबू उमाळकर यांनीही हजेरी लावल्याने जिल्हा काँग्रेसमधील धुसफूस प्रदेश स्तरापर्यंत पोहोचली असल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्ष निरीक्षकांनी सर्व नेत्यांची बाजू ऐकूण घेतली. यावेळी बैठकीचे मेजबानपद ज्येष्ठ नेते सुनील धाबेकर यांच्याकडे होते.

थेट तक्रार टाळण्याचा प्रयत्न

काँग्रेसमधील नाराज नेत्यांनी एकत्र येऊन जिल्हाध्यक्षांच्या कार्यप्रणालीबाबत दुसऱ्यांदा नाराजीचा सूर आवळला आहे. मात्र, प्रदेशकडे थेट तक्रार करण्याची कुणाचीही तयारी नाही. नेतृत्व बदलाबाबतचा विषयाला फाटा देत पक्ष निरीक्षकांपुढे जिल्हाध्यक्षांनी त्यांची कार्यप्रणाली बदलावी, असा सूर नाराज नेत्यांच्या बैठकीत उमटला. मात्र, काही तालुका अध्यक्षांनी थेट मुद्याला हात घालत जिल्ह्यातील नेतृत्व बदलाची मागणी केल्याचे समजते.

नानाभाऊपर्यंत पोहोचविणार नाराजी

अकोला जिल्हा काँग्रेसमध्ये सुरू असलेली धुसफूस व नेत्यांच्या नाराजीवरून काँग्रेसमध्ये दोन गट पडण्याची भिती व्यक्त होत आहे. त्यामुळे पक्ष निरीक्षक श्यामबाबू उमाळकर यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आता ‘तलाठ्यां’ची बाजू थेट प्रदेशाध्यक्षांकडे मांडणा असल्याबाबत बैठकीत उपस्थित नेत्यांना आश्वस्थ केले.

काही नेत्यांनी फिरविली पाठ

अकोट येथील पहिल्या बैठकीला उपस्थिती असलेल्या नेत्यांपैकी काही ज्येष्ठ नेत्यांनी महान येथील बैठकीकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. बैठकीसाठी खास निमंत्रित करण्यात आलेल्या दोन नेत्यांनीही बैठकीपासून दोन पावले दूर राहण्याचा निर्णय घेतला. यात एका डॉक्टर नेत्यासह प्रदेश कार्याकारिणीतील प्रमुख नेत्यांचाही समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT