अकोला

अकोला : शिवसेनेच्या आठ नगरसेवकांसह राष्ट्रवादीचा नगरसेवक निलंबित

सकाळ वृत्तसेवा

अकोला : मालमत्ता कराच्या थकीत रकमेवर व्याज आकारणीच्या मुद्यावरून ऑनलाइन सभा सोडून शिवसेनेच्या सदस्यांसह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी थेट महापौरांच्या दालनात प्रवेश केला. शिवसेनेचे गटनेते राजेश मिश्रा यांनी ऑनलाइन सभा बंद पाडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महापौरांनी शिवसेना गटनेत्यांसह आठ नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक रहीम पेंटर यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. महानगरपालिकेची सभा सुरू होण्यापूर्वीच हा गोंधळ झाला.

अकोला महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी सकाळी ११.३० वाजता आयोजित करण्यात आली होती. ही सभा ऑनलाइन असली तरी शिवसेनेच्या सदस्यांनी थेट महौपार व आयुक्त बसलेल्या दानात प्रवेश केला. यापूर्वीच्या सभेत मालमत्ता करावरील व्याज आकारणीला तीन महिन्यांची स्थगिती देण्याचा ठराव घेण्यात आला असताना केवळ एक महिन्याची सक्ती माफ का केली, असा प्रश्न करून शिवसेना गट नेते राजेश मिश्रा यांनी सभा सुरू होण्यापूर्वीच सभेचे कामकाज थांबवून धरले.

उपायुक्त वैभव आवारे यांना उत्तर देण्याचा अधिकार नसल्याने प्रभारी आयुक्त निमा अरोरा यांना बोलाविण्यात आले. एका तासानंतर त्या सभागृहात दाखल झाल्यात. मात्र, शिवसेना गटनेते यांच्यासह सर्व शिवसेना नगरसेवकांनी सभागृहात शास्तीच्या विषायावरून सभा सुरू करण्यास विरोध दर्शविला.

मात्र, आयुक्त निमा अरोरा या त्यांच्या मतावर ठाम राहिल्याने राजेश मिश्रा यांनी महापौर व आयुक्तांच्या पुढील कॅमेरा बंद केला. परिणामी महापौरांनी राजेश मिश्रा यांच्यासह शिवसेनेच्या नगरसेवकांना एका सभेसाठी निलंबित करण्याचा आदेश दिला. शिवसेनेच्या नगरसेवकांसोबत राष्ट्रवादीचे रहीम पेंटरही सभागृहात उपस्थित होते. त्यांनाही महापौरांनी निलंबित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna News: तहसीलदारांसमोरच लिपिक अन् कोतवाल भिडले! अंबड तहसील कार्यालयात फ्रीस्टाइल हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणात मोठी कारवाई; सहसंस्थापक रवी उप्पलला दुबईत अटक

Jalna Water Shortage: हिवाळ्यातच अंबड तालुक्यात दुष्काळाच्या झळा! ३२ गावांची तहान भागवण्यासाठी ३९ टँकर सुरू

WPL 2027 चे वेळापत्रक जाहीर! MI vs RCB सामना कधी? मुंबई अन् बडोद्यात रंगाणार सामने

Supreme Court: मुख्य निवडणूक आयुक्तांना मिळणारे अमर्याद कायदेशीर संरक्षण आता जाणार की राहणार? सर्वोच्च न्यायालयाची...

SCROLL FOR NEXT