Congress leader Prakash Tayde has demanded that the Maharashtra government conduct an independent census of OBCs 
अकोला

महाराष्ट्र सरकारने स्वतंत्रपणे ओबीसींची जनगणना करावी; काँग्रेस नेते प्रकाश तायडे यांची मागणी

सकाळ वृत्तसेवा

अकोला : सुप्रीम कोर्टाने नुकताच एका याचिकेवर निर्णय दिला असून, त्यामध्ये ओबीसीचे पदे कमी होणार आहेत. ५० टक्केपेक्षा जास्त राजकीय आरक्षण असणाऱ्या पाच जिल्हा परिषदांमध्ये ओबीसीची जी पदे कमी करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आहे. अनुसूचित जाती जमातीची पदे निर्धारण करताना लोकसंख्येचा आधार घेतला जातो. मात्र ओबीसी जनगणना न झाल्यामुळे लोकसंख्येचा ओबीसी आरक्षणाला आधार घेता येत नाही व त्यामुळे आरक्षणातील प्रमाण लोकसंख्येच्या आधारावर देता येत नाही. म्हणून महाराष्ट्र सरकारने जनगणना अभावी होणाऱ्या ओबीसीवरील या अन्यायाला दूर करावे व महाराष्ट्रापुरते का होईना पण ओबीसीची स्वतंत्र जनगणना त्वरित करावी, अशी मागणी काँग्रेस नेते प्रकाश तायडे यांनी केली आहे.

अकोल्याच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 
 
ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्येच आरक्षण आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती अथवा ग्रामपंचायतमध्ये लोकसभा आणि राज्यसभेत किंवा विधानसभेत विधान परिषद याठिकाणी कुठलीही राजकीय आरक्षण ओबीसींना नाही. त्यामुळे हा प्रश्न राज्यस्तरावरचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होणाऱ्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येतात. म्हणून राज्यातील ओबीसी जनगणना झाली तर ओबीसीचे पदे निश्चित करण्यासाठी लोकसंख्येचा आधार हा उपयोगी पडेल आणि त्याच आधारावर ओबीसींचे राजकीय प्रतिनिधित्व वाढेल. ओबीसींना न्याय मिळेल. या निकालाचा परिणाम नोकरी किंवा शैक्षणिक आरक्षणावर पडणार नाही.

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर पाच जिल्हा परिषदेमधील ओबीसींची सभासदांची संख्या तर कमी झालीच तसेच पंचायत समिती सभासदांची संख्या सुद्धा कमी झाली आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील अनेक ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांना सुद्धा आता आपली पद सोडावे लागणार आहेत. ओबीसींच्या आरक्षणातून ते पदापर्यंत पोहोचले होते. महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीच्या उर्वरित राहिलेल्या निवडणुका होणार आहेत. पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. त्या आधी सरकारने जनगणना पूर्ण करावी. जेणेकरून ओबीसींवर राजकीय होणारा अन्याय थांबेल, असे मत प्रकाश तायडे यांचा प्रमुख उपस्थिती झालेल्या ओबीसी बैठकीत मांडण्यात आले. 

या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री ठाकरे, ओबीसी मंत्री विजय वेडट्टीवर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, व ओबीसी मंत्र्यांना पाठविण्यात आले. यावेळी संजय बोडखे, सत्यनारायण घाटोळ, नितीन ताकवाले, आकाश कवडे, अतुल मोडतकर, सुनील वासानकर, मुकुंदराव सांगाडे, सतीश गायकवाड, चंद्रकांत बारतसे, अमोल इंगळे, विलास जाधव, दत्ता खरात, स्वप्निल पाठक आदींची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asim Sarode: असीम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द; 'हे' वादग्रस्त विधान भोवलं

World Cup 2025: ...अन् हरमनप्रीत कौर कोच अमोल मुजूमदारला पाहताच पडली पाया; विश्वविजयानंतरचा भावूक करणारा क्षण

Latest Marathi News Live Update : इचलकरंजी महापालिका निवडणूकीत पाणी प्रश्न पेटणार

Priyanka Gandhi: हवाप्रदूषण कमी करण्यासाठी एकत्र काम करू; खासदार प्रियांका गांधी वद्रा यांचे केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला आवाहन

New Year 2026 Skin Care: नववर्षात हवी ग्लोइंग स्किन? मग आत्ताच सुरू करा 'हा' 2 महिन्यांचा स्किनकेअर प्लॅन

SCROLL FOR NEXT