bribe crime esakal
अकोला

Akola Crime : तीन हजारांची लाच घेणारा हवालदाराला अटकेत

अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात वाडेगाव पोलिस चौकीतील हवालदाराला तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना शुक्रवारी अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

अकोला - अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात वाडेगाव पोलिस चौकीतील हवालदाराला तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना शुक्रवारी अटक केली.

हवालदार सुभाष शालिकराम दंदी (५६) यांनी वाडेगाव येथील २८ वर्षीय तक्रारदाराला प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येऊ नये यासाठी चार हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

तडजोडीत तीन हजार रुपये स्वीकारताना अमरावती एसीबीच्या पथकाने त्याला अटक केली. तक्रारदारावर बाळापूर ठाण्यात भादंवि कलम ५०४, ५०६ अन्वये अदखलपात्र गुन्हा नोंद आहे. त्या अनुषंगाने तक्रारदारावर प्रतिबंधक कारवाई करू नये यासाठी सुभाष दंदी यांनी चार हजारांची मागणी केली. तडजोडीत ठरलेली तीन हजारांची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली असता शुक्रवारी आरोपी लोकसेवकाला ताब्यात घेण्यात आले.

आरोपी हवालदाराविरुद्ध बाळापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई एसीबीच्या अमरावती परीक्षेत्राचे पोलिस अधीक्षक मारुती जगताप, अप्पर पोलिस अधीक्षक देविदास घेवारे, पोलिस उपअधीक्षक शिवलाल भगत, मिलिंदकुमार बहाकार यांच्या मार्गदर्शनात अमरावती एसीबीचे पोलिस निरीक्षक चित्रा मेसरे, केतन मांजरे, पोलिस कर्मचारी चित्रा वानखडे, नीलेश महिंगे, संजय कोल्हे, आशिष जांभोळे, बारबुध्दे, स्वप्नील क्षीरसागर यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: धक्कादायक! विमानतळावर होमगार्डनं जीवन संपवलं; एटीसी परिसरात फासावर लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

Kantara 2 Twitter Review: कसा आहे रिषभ शेट्टीचा 'कांतारा चॅप्टर १'? ट्विटर रिव्ह्यू वाचून लगेच कळेल; नेटकरी म्हणतात-

IND vs WI, 1st Test: पायात क्रॅम्प, तरीही KL Rahul मैदानावर उभा राहिला; पहिल्या दिवशी मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराहसह तोही चमकला

Google LayOff: टेक विश्व हादरलं! कोणतीही सूचना न देता गुगलनं अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं, वेगळचं कारण समोर

Dussehra Melava 2025 Live Update: पाच वर्षांचा शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल

SCROLL FOR NEXT