Akola Municipal Corporation sakal
अकोला

Akola News : ऑडिओ क्लिप अन् अधिकाऱ्यांची चौकशी, मनपा आयुक्तांचा आदेश!

महानगरपालिका क्षेत्रातील मोकाट कुत्र्यांचे निर्बिजिकरण करण्याचे कंत्राट घेणाऱ्या कंत्राटदाराने ऑडिओ क्लिप

सकाळ वृत्तसेवा

Akola : अकोला : महानगरपालिका क्षेत्रातील मोकाट कुत्र्यांचे निर्बिजिकरण करण्याचे कंत्राट घेणाऱ्या कंत्राटदाराने ऑडिओ क्लिप ऐकवित आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांच्याकडे संबंधित अधिकाऱ्याची तक्रार केली. या तक्रारीवरून आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्याच्या चौकशीचा आदेश दिला आहे. ही चौकशी समितीमार्फत होणार आहे.

महानगरपालिका आयुक्त कविता द्विवेदी यांची बदली झाली असून, औरंगाबाद येथील सुनील लहाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, लहाने अद्याप रूजू झाले नाहीत. आयुक्त द्विवेदी याही कार्यमुक्त झाल्या नाहीत.

मात्र, त्यापूर्वीच त्यांनी कोंडवा विभागाच्या कंत्राटदाराकडून झालेल्या तक्रारीवरून विभाग प्रमुख अनिल बिडवे यांची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. संबंधित फाईलवर सोमवारी सायंकाळी आयुक्तांनी स्वाक्षरी केली.

शहरात मोकाट कुत्र्यांच्या निर्बिजिकरणाचे कंत्राट देण्यात आले होते. या कामात दिरंगाई होत असल्याने व त्यासंदर्भात लोकप्रतिनिधींकडून वारंवार तक्रारी येत असल्याने आयुक्तांनी काही दिवसांपूर्वी संबंधित कंत्राटदाराला बोलावून समज दिला होता. काम थांबविण्याबाबत विचारणा केली असता संबंधित कंत्राटदाराने मनपा अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या त्रासाबाबत आयुक्तांपुढे तक्रार केली.

आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्याकडे याबाबत पुरावा मागितला. तेव्हा संबंधित कंत्राटदाराने अधिकाऱ्यासोबत मोबाईलवरून झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिपच आयुक्तांना ऐकवली.

त्यातील संबंधित अधिकाऱ्यांकडून कंत्राटदाराकडे करण्यात आलेल्या ‘डिमांड’चा उल्लेख असल्याने आयुक्तांनी तातडीने चौकशी करण्यासंदर्भात आदेश दिला. ही चौकशी मनपाच्या समितीकडूनच केली जाणार आहे. याबाबत सोमवारपासून मनपा वर्तुळात चांगलीच चर्चा रंगत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT