corona akola.jpg 
अकोला

बापरे! असे आढळले कोरोनाचे रुग्ण...शहरी क्षेत्रात 93 टक्के तर ग्रामीणमध्ये...

सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-19 रोगाची शहरी क्षेत्रात 93 टक्के व ग्रामीण क्षेत्रात 3 टक्केच लागण झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव नाही, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या सभेत दिली.

महापालिका क्षेत्रात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या सोमवारी (ता. 15) पार पडलेल्या सभेत कोरोना विषाणूचा ग्रामीण भागातील प्रभाव व त्यावर बदल्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घेण्यात आली. सभेत उपाध्यक्ष सावित्री राठोड यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्याचे निर्देश आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. कोविड-19 उपाययोजनांसाठी ग्रामीण भागासाठी 3 कोटी 61 लक्ष 63 हजार रुपये मिळाले. त्यापैकी 2 कोटी 55 लक्ष 14 हजार रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

ग्रामीण भागातील 15 वैद्यकीय अधिकारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सेवा देत असल्याने ग्रामीण भागातील आरोग्य सेवा प्रभावित झाली आहे. त्यामुळे त्यांची सेवा त्वरीत रद्द करण्याचा निर्णय समितीच्या सभेत घेण्यात आला. जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य व अर्थ समिति सभापती सावित्री राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या समितीच्या सभेला पुष्पा इंगळे, अर्चना राऊत, प्रमोदीनी दांदळे, गोपाळराव भटकर, अनंतराव अवचार, गणेशराव बोबळे, अकोला पंचायत समिति सभापती वसंतराव नागे आदी सदस्य उपस्थित होते. यावेळी समिती सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस.वाय. असोले यांनी कामकाज पार पाडले. 

ग्रामपंचायतींवर कारवाईची मागणी
शासनाच्या निर्देशावर आणि जिल्हा परिषदेने वारंवार सांगितल्यानंतरही ग्रामपंचायतींकडे असलेल्या चौदाव्या वित्त आयोगाचा निधी आरोग्यावर ज्या ग्रामपंचायतींनी खर्च केला नाही त्या ग्रामपंचायत सचिवावर फौजदारी तर ग्रामपंचायतवर कार्यवाही करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तथा सदस्य पुष्पा इंगळे यांनी आरोग्य समितीच्या सभेत केली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

Kannad Teacher Credit Society: आमसभेत आर्थिक अनियमिततेचे आरोप; चर्चा सुरू असतानाच राष्ट्रगीताने सभा गुंडाळल्याचा दावा

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

Marathi News Live Updates : भारत आणि जपानच्या हवाई दल प्रमुखांचे 'तेजस'मधून उड्डाण

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT